शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

एक्स्प्रेस वेवर वाय-फाय

By admin | Published: January 07, 2017 5:35 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर लवकरच वायफायची सुविधा मिळणार

नारायण जाधव,

ठाणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर लवकरच वायफायची सुविधा मिळणार असून त्यासाठी टेलिकॉम आॅपरेटर्सकडून निविदा मागवल्या आहेत. वायफाय नेटवर्कमुळे एमएसआरडीसीसह राज्य महामार्ग पोलिसांनाही सीसीटीव्हीच्या माध्यमातून टोल बूथवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेसह घोडबंदर रोडवर कोणत्या भागांमध्ये वायफाय झोन तयार केला जाऊ शकतो, याची तपासणी सुरू आहे. तसेच भविष्यात एफएमसेवेच्या माध्यमातूनही प्रवाशांना वाहतूककोंडीची अथवा एखादा अपघात घडल्यास त्याची माहिती दिली जाणार आहे. यासाठी नेमके किती वायफाय झोन- हॉटस्पॉट सुरू करायचे, तसेच शुल्क आकारणी करायची का, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी या तिन्ही कामांसाठी रस्ते विकास महामंडळाने संबंधितांकडून निविदांद्वारे देकार मागवले आहेत.मुंबई-पुणे रस्त्यावरील प्रवास जलद व्हावा, म्हणून सुमारे ३३३१ कोटी रुपये खर्चून खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यान १.७५ आणि ८.९४ किमी लांबीचे प्रत्येकी चार लेनचे दोन बोगदे, १२ किमीचा बायपास रस्ता आणि खालापूर फूड मॉल ते खोपोलीदरम्यान आठपदरी एलिव्हेटेड रस्ता बांधण्यात येणार आहे. शिवाय, मानखुर्द ते वाशी खाडीदरम्यान ५९० कोटी रुपये खर्चून तिसरा सहापदरी खाडी पूल बांधण्यात येणार आहे. या कामांमुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांचा सुमारे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ वाचणार आहे.>एक बोगदा डोंगरातून, दुसरा तलावाखालूनसुसाट वाहतुकीसाठी जे बोगदे बांधण्यात येणार आहेत, त्यातील एक डोंगरातून, दुसरा लोणावळा लेकखालून नेण्यात येणार असल्याचे समजते.मोबाइल नेटवर्कवरही भरवायफायव्यतिरिक्त मोबाइल नेटवर्कसुविधाही मजबूत करण्यावर एमएसआरडीसी भर देत आहे. संजय गांधी उद्यानामुळे घोडबंदर रोड आणि खंडाळा घाटातील डोंगराच्या रांगांमुळे एक्स्प्रेस-वेवर अनेक ठिकाणी मोबाइल नेटवर्क मिळत नाही. त्या ठिकाणी टेलिकॉम आॅपरेटर्सनी बेस ट्रान्सिव्हर सर्व्हिस बसवावेत, असा एमएसआरडीसीचा आग्रह आहे.वाशी खाडीपुलाचा होणार विस्तार : जुना खाडीपूल कमकुवत झाल्याने १९९७ साली तीनपदरी दोन पूल बांधण्यात आले. मात्र, गेल्या वर्षांपासून सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण होऊन तो सायन ते कळंबोली असा दहापदरी झाला आहे. यामुळे सध्या वाशीखाडी ते टोलनाक्यापर्यंत वाहतूककोंडी होते. त्यावर उपाय म्हणून १.८४ किमी लांबीचा हा नवा खाडीपूल बांधण्यात येणार आहे. यात तीनतीन पदरांचे दोन पूल बांधण्यात येणार आहेत. तर, १.३९ किमी लांबीचा नवीन अ‍ॅप्रोच रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा १० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.>एकूण १४ लेनसध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सहा लेन आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चार अशा १० लेन आहेत. बायपासमुळे आणखी चार लेनची भर पडणार असून यामुळे हा महामार्ग १४ लेनचा होणार आहे.