शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गुणवत्तेच्या निकषांवर हद्दवाढ करा

By admin | Published: June 19, 2016 1:35 AM

हद्दवाढ कृती समितीची मागणी : ..तर शहराचा कधीही विकास होणार नाही; राजकीय भूमिकेतून पाहू नका

- सद््गुरू पाटील, पणजी

पर्यटकांचे नंदनवन असलेले गोवा अलीकडे एका बाजूने वाढता ड्रग्ज व्यवसाय आणि शरीरविक्रय व्यवसायामुळे बदनामीच्या फेऱ्यात अडकू लागले आहे. विशेषत: गोव्याच्या किनारपट्टीतच ड्रग्ज व इतर अवैध व्यवसाय वाढू लागल्यामुळे गोव्याच्या पर्यटनावरही त्याचा परिणाम होत आहे.वार्षिक सरासरी ६० लाख पर्यटकांनी गोव्याला भेट देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जुनेगोवे येथे होणारे जगप्रसिद्ध सेंट झेवियर फेस्ट, येथील रूपेरी वाळूचे सागरकिनारे, लॅटीन संस्कृतीचा प्रभाव असलेली येथील पोर्र्तुगीजकालीन वास्तुकलेत आदर्श ठरणारी घरे, येथील पांढरीशुभ्र चर्च आणि सुबक, देखणी मंदिरे पर्यटकांना भुरळ पाडतात. दाबोळी विमानतळावर ‘व्हिसा आॅन अरायव्हल’ची व्यवस्था झाल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या गोव्यात वाढू लागली आहे.दुसरीकडे पंजाबनंतर गोवा अमली पदार्थांसाठी ओळखले जाऊ लागल्याने, पर्यटन व्यवसायातील विविध घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या महिन्यात आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनीही गोव्याचे पर्यटन म्हणजे ड्रग्ज व शरीरविक्रय असे चित्र उभे राहणे चिंताजनक असल्याचे नमूद केले होते. सत्ताधारी भाजपामधील मंत्री, आमदारही गोव्यातील वाढता ड्रग्ज आणि वेश्या व्यवसाय याबाबत जाहीर कबुली देऊन सरकारवर टीकाही करू लागले आहेत. अमली पदार्थ गोव्यात सहज मिळतात, असे जलसंसाधनमंत्री दयानंद मांद्रेकर म्हणाले होते. अभाविपनेही ड्रग्जबाबत गोव्यात खूप चिंताजनक स्थिती असल्याचे म्हटले आहे. गोव्यात नेपाळ, हिमाचल प्रदेश अशा भागांतून अमली पदार्थांचा शिरकाव होतो, असा पोलिसांना संशय आहे. हजारो कोटींची अर्र्थव्यवस्था या व्यवसायाने गोव्याच्या किनारपट्टीत उभी केली आहे. गोव्यातील फोंडा अभियांत्रिकी कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडेही महिन्यापूर्वी पोलिसांना अमली पदार्थ सापडले आहेत. गोव्यातील तारांकित हॉटेलमध्ये कॉल गर्ल्स सर्रास आढळत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.पोलिसांनी काही बॉलीवूड कलाकार व हायप्रोफाइल व्यक्तींचा समावेश असलेले सेक्स रॅकेट १५ दिवसांपूर्वी पकडले. पोलीस वार्षिक सरासरी ५० छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करतात. किमान दहा-बारा व्यक्तींना अटक होते, पण ड्रग्ज व्यवसायाला आळा घालता आलेला नाही.गोव्यात अलीकडे सेक्स रॅकेट व वेश्या व्यवसाय वाढू लागला आहे. आपल्याकडे याविषयी माहिती असून, पोलिसांना हवी असल्यास आपण ती देऊ शकतो. गोव्याच्या पर्यटनासाठी हे चिंताजनक आहे. - आ. विष्णू वाघ, साहित्यिक ड्रग्ज व वेश्या व्यवसायाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत आता कमी झाले आहे. गोव्याचे नाव पर्यटनाबाबत बदनाम होऊ नये, म्हणून सरकार काळजी घेत आहे. पर्यटन वाढले की, काही अपप्रवृत्ती वाढतात, पण गोवा राज्य अजूनही संस्कृती, आदरातिथ्य, सुंदर मंदिरे, चर्च, किनारे, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती यासाठीच ओळखले जाते. - दिलीप परुळेकर, पर्यटनमंत्री