हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील २ हजार ५0४ सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. तथापि, या विहिरींसाठी यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नमूद केले आहे. राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात जवाहर विहीर योजना तसेच विदर्भातील आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यांमध्ये ही योजना धडक सिंचन विहीर या नावाने अनुदान तत्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सन २00७-0८ व २00८-0९ मध्ये ५१ हजार ८00 जवाहर विहीरींचा व ८३ हजार २00 धडक सिंचन विहिरींचा लक्ष्यांक ठरवून देण्यात आला होता. या तसेच इतर लाभार्थी प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या विहीरी पूर्ण ३0 जूनपर्यंतची मुदत होती. मात्र ९१५ जवाहर विहिरी व १५८९ धडक सिंचन विहिरी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने यासाठी ३0 जून २0१६ पर्यंत मुदतवाढ दिली.
अडीच हजार विहिरींच्या कामांना मुदतवाढ !
By admin | Published: August 12, 2015 11:08 PM