शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

नागपूर विमानतळाचा खासगीकरणातून विस्तार

By admin | Published: March 11, 2016 4:23 AM

नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार खासगीकरणातून करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २२०० कोटी रुपये खर्च येणार असून आंतरराष्ट्रीय

 यदु जोशी,  मुंबईनागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार खासगीकरणातून करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २२०० कोटी रुपये खर्च येणार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफक्यू) मागविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, या विस्तारांतर्गत दुसरा रन-वे, टर्मिनल बिल्डिंग, टॅक्सी वे आदींची उभारणी करण्यात येणार आहे. संपूर्ण उभारणी करून देणे, विमानतळाचे विशिष्ट कालावधीपर्यंत संचालन करून नंतर हस्तांतरण करणे, आलेल्या उत्पन्नातून विशिष्ट वाटा मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) देणे असे स्वरुप असेल. नागपूरचा विमानतळ हा केंद्रीय विमानतळ प्राधिकरण आणि एमएडीसीची संयुक्त कंपनी असलेल्या एमआयएलकडे आहे. रिक्वेस्ट फॉर प्रपोजलमध्ये समोर आलेल्या कंपन्यांच्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर कोणत्या नामवंत कंपन्या या ठिकाणी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत हे स्पष्ट होईल. आंतरराष्ट्रीय निविदा काढण्याचा मार्गही मोकळा होईल. आंतरजिल्हा वाहतूकमध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात आंतरजिल्हा विमान वाहतूक सुरू करण्याच्या एमएडीसीच्या प्रस्तावास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कमी आसन क्षमता असलेल्या विमानांद्वारे ही वाहतूक केली जाईल. ५०० एकरात उभारणारकृषी-वन प्रक्रिया झोननागपूरच्या मिहान प्रकल्पात ५०० एकरामध्ये कृषी-वन प्रक्रिया झोनची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या उद्योगांना विदर्भातील शेतकऱ्यांकडून १०० कोटी रुपयांचा शेतमाल दरवर्षी खरेदी करण्याची सक्ती असेल. किमान १० हजार शेतकऱ्यांशी एकावेळी करार करावे लागतील. तसे करार त्यांना करावे लागतील. मंजुरीनंतर सहा महिन्यांत उद्योगाची उभारणी सुरू करावी लागेल आणि १८ महिन्यांत ती पूर्ण करावी लागेल. नाहीतर, १० कोटी रुपयांची सुरक्षा ठेव सरकारजमा होईल. कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी दरवर्षी १० हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. नवीन विमानतळासाठी इन्स्पेक्शन लवकरचपुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यासाठी सध्याच्या विमानतळाजवळ जागा शोधण्यात आली आहे. या जागेची पाहणी करून केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने अहवाल द्यावा यासाठी त्यांच्याकडे एमएडीसीकडून लवकरच शुल्क भरण्यात येणार आहे. शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. अमरावती, धुळे विमानतळाचा विकासअमरावती येथील विमानतळाची धावपट्टी पूर्णपणे नव्याने बांधण्यास परवानगी देण्यात आली. हे काम करण्यास विमानतळ प्राधिकरणाने असमर्थता दर्शविली आहे. आता ते एमएडीसीमार्फतच केले जाईल. धुळे विमानतळाची दुरुस्ती करण्यासही मंजुरी देण्यात आली.