बुलडाणा : विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील २ हजार ५०४ सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. तथापि, या विहिरींसाठी यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नमूद केले आहे.राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात जवाहर विहीर योजना तसेच विदर्भातील आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यात ही योजना धडक सिंचन विहीर या नावाने अनुदान तत्त्वावर राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सन २००७-०८ व २००८-०९मध्ये ५१ हजार ८०० जवाहर विहिरींचा व ८३ हजार २०० धडक सिंचन विहिरींचा लक्ष्यांक ठरवून देण्यात आला होता. या तसेच इतर लाभार्थी प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या विहिरी पूर्ण करण्यासाठी ३० जूनची मुदत होती. मात्र ९१५ जवाहर विहिरी व १५८९ धडक सिंचन विहिरी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने यासाठी ३० जून २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली.
विहिरींच्या कामांना मुदतवाढ
By admin | Published: August 13, 2015 2:28 AM