शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अतिरिक्त शिक्षकांची उपासमार थांबली!

By admin | Published: March 03, 2017 2:15 AM

अतिरिक्त शिक्षकांच्या गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या वेतनाला अखेर २ मार्चचा मुहूर्त सापडला आहे.

मुंबई : अतिरिक्त शिक्षकांच्या गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या वेतनाला अखेर २ मार्चचा मुहूर्त सापडला आहे. संबंधित अतिरिक्त शिक्षकांचे वेतन गुरुवारी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहे. शिक्षक परिषदेने अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनासाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर शासनाने तातडीने हा निर्णय घेतल्याचा दावा शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.याआधी मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन डिसेंबर महिन्यापासून बंद केल्याने, तीन महिन्यांपासून शिक्षकांची उपासमार सुरू होती. यासंदर्भात शिक्षण विभागातून वेतनासाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप करत शिक्षक परिषदेने २२ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. शिवाय शिक्षण उप संचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावाही केला होता. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेर अतिरिक्त शिक्षकांसह बोरनारे यांनी नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत समज देताच प्रशासकीय चक्रे फिरली. अतिरिक्त शिक्षकांना वेतन देण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित केल्याचे बोरनारे यांनी सांगितले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही अतिरिक्त शिक्षकांना वेतन मिळाले नसते, तर शिक्षक परिषदेचे आंदोलन निश्चित होते. मात्र अतिरिक्त शिक्षकांचे नियमित वेतन त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तरी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांच्या फरकाची रक्कमही तातडीने द्यावी, या मागणीसाठी अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)