लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शाळा व शिक्षण विभागाने कोणतीही माहिती न देता, अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, शिक्षकांचे आक्षेप जाणून घेत, त्यावर सुनावणी घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाकडे केली आहे. नाहीतर समायोजन प्रक्रिया पार पडू देणार नाही, असा इशाराच शिक्षक परिषदेने प्रशासनाला दिला आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, अतिरिक्त झालेल्या अनेक शिक्षकांना शाळा व शिक्षण विभागाने न कळवताच यादी प्रसिद्ध केली आहे. त्यातच अनेक शिक्षक उन्हाळी सुट्टीत गावी गेल्याने त्यांच्यापर्यंत ही माहितीच गेलेली नाही. परिणामी, प्रशासनाने आधी यादीबाबत शिक्षकांना रीतसर कळवावे आणि त्यावर शिक्षकांचे काही आक्षेप असतील, तर त्यावर सुनावणी घ्यावी. मगच प्रशासनाने अंतिम यादी घोषित करावी, या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेने मुंबई शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे. ज्या शाळांची सेवाज्येष्ठता यादी चुकीची आहे व रोष्टर अपूर्ण आहे, त्याचा फटका शिक्षकांना बसत असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे.
अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध!
By admin | Published: May 08, 2017 4:46 AM