मुंबई : गणेशोत्सवानिमित्त एसटीने कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांची सोय व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या जादा बसही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. रेल्वेबरोबरच एसटीही फुल झाल्याने आता खासगी बसचा पर्याय त्यांच्यासमोर राहिला आहे. रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी २00 पेक्षा जादा फेऱ्या होणार आहेत. त्याचे आरक्षणही फुल झालेले आहे. पनवेल-चिपळूण सारखी अनारक्षित डेमू सेवाही सुरु करण्यात आली आहे. मागील वर्षी १ हजार ९१३ जादा बस महामंडळातर्फे सोडण्यात आल्या होत्या. या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदा दोन हजार बसेस सोडतानाच यातील १,३00 ग्रुप बुकींग पध्दतीने सोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे ऊर्वरीत ७00 बसचे आरक्षण हे १२ आॅगस्टपासून सुरू झाले. यात सर्व बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आणखी ३00 बसचे नियोजन असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. खासगी वाहनांचे बुकींग मोठ्या प्रमाणात केली जात असून मुंबई ते चिपळूण प्रवासासाठी १0 ते १५ हजार रुपये आकारण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)एसटीकडून ३00 जादा बस सोडण्यात येतच आहेत. त्याशिवाय रेल्वेकडूनही जादा फेऱ्या सोडण्यात आल्या असून पनवेल-चिपळूण सारख्या डेमू ट्रेनचा कोकणवासियांनी फायदा उचला पाहिजे. - दिवाकर रावते (परिवहन मंत्री)
जादा गाड्याही हाऊसफुल्ल
By admin | Published: September 10, 2015 2:57 AM