शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आॅनलाइन खरेदीला उधाण

By admin | Published: October 28, 2016 4:17 AM

दिवाळीच्या मुहूर्तावर भरघोस सूट जाहीर केल्याने आॅनलाइन खरेदीला उधाण आले आहे. वेगवेगळ््या वेबसाइट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीवर

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर भरघोस सूट जाहीर केल्याने आॅनलाइन खरेदीला उधाण आले आहे. वेगवेगळ््या वेबसाइट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीवर १० ते तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. त्यामुळे ग्राहकही खरेदीसाठी तुटून पडले असून, गॅझेट्स खरेदीला मोठी पसंती आहे.दिवाळीनिमित्त कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी उसळली आहे. दुसरीकडे एकाच क्लिकवर विविध ब्रँडच्या वस्तू आॅनलाइन उपलब्ध असल्याने त्याकडे आकर्षित झालेल्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. दिवाळीआधी १० ते ४० टक्के सूट दिलेल्या आॅनलाइन कंपन्यांनी आत्ता उत्पादनांवर थेट ८५ टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. भाऊबीजेला चांगले गिफ्ट म्हणून गॅझेट्सला पसंती आहे. ग्राहकांच्या मागणीमुळे मोबाइल, टॅब व लॅपटॉप घरपोच मिळवण्यासाठी ग्राहकांना पाच ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ब्रँडेड कपडे, परफ्युम, शूज, इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स व ब्रँडेड घडाळ््यांनाही मागणी आहे. नामांकित ब्रँडच्या वस्तूंवर ५० टक्क्यांहून अधिक सूट देऊन, तरुणाईला आकर्षित करण्यास आॅनलाइन वेबसाइट्स यशस्वी ठरल्या आहेत. त्याचा फटका किरकोळ दुकानदारांना बसला आहे. (प्रतिनिधी)सोन्याऐवजी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना पसंतीगतवर्षीच्या तुलनेत सोन्याचा दर यंदा जास्तच चढा आहे. गेल्या वर्षी २५ हजार ४७१ रुपये प्रति तोळा असलेले सोने, यंदा ३० हजार ३०० रुपयांवर धडकले आहे. मुहूर्ताला सोन्याच्या छोट्या वस्तू खरेदी करणारे ग्राहक फ्रिज, वॉशिंग मशिन आणि टी.व्ही. खरेदी करत आहेत. सोशल मीडियावर दिवाळीची धूमसोशल मीडिया, तरुणाई आणि त्यांच्या पोस्ट यामुळे नेहमी चर्चेत राहणारे नेटिझन्स दिवाळीतही आॅनलाइन दिसत आहेत. शहरात वसुबारस मोठ्या प्रमाणावर साजरी होत नसली, तरी नेटिझन्सनी चित्रसंदेश, चारोळी व्हायरल करत धावणाऱ्या मुंबईकरांना दिवाळी आल्याची चाहूल देत शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.दिवाळीसाठी नेटिझन्समध्ये शुभेच्छांसह विशेष पोस्ट, चित्रसंदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. दहशतवादी हल्ले करणाऱ्या देशाला मदत करणारा चीन, नेटिझन्सच्या ‘ब्लॅक लिस्ट’वर असल्याचे दिवाळी निमित्ताने पाहायला मिळत आहे. परिणामी, चीनविरोधी पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर विविध ग्रुपमध्ये फिरत आहेत. त्याचबरोबर, हॅशटॅग दिवाळी, हॅशटॅग से नो टू चायना असे हॅशटॅग वापरून टिष्ट्वट करण्यासाठी नेटिझन्समध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. विद्युत रोषणाई, रांगोळी यांच्या चित्रसंदेशाने सोशल मीडिया झगमगाटासह सजलेली दिसत आहे. शिवाय, दिवाळीच्या दिवसांचे महत्त्व सांगणारे संदेशदेखील व्हायरल करण्यात नेटिझन्स आघाडीवर आहेत.आॅनलाइन खरेदीमुळे दिवाळीतील उलाढालीत यंदा ३० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळत असल्याने, त्यांची पसंती आॅनलाइनला मिळत आहे. मात्र, तोट्यात जाणाऱ्या गुंतवणूकदारांमुळे लवकर आॅनलाइनचे बस्तान गुंडाळले जाईल. त्यामुळे दुकानदारांनी संयम ठेवावा.- विरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन