पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) टर्मिनल विकासासाठी मेट्रोच्या निधीतील ७ कोटी रुपये वापरण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. मेट्रोसाठीच्या ६७ कोटी रुपयांमधून हे पैसे वर्ग करून घेण्याचा प्रस्ताव आहे. एकूण १३ कोटी रुपयांचा खर्च करण्यासाठी पालिकेच्याच अन्य विभागातूनही पैसे उभे करण्यात येणार आहेत. होणार की नाही, असे प्रश्नचिन्ह उभे असलेल्या प्रकल्पाचा निधी असा घेण्यामुळे मेट्रोबाबतचीशंका अधिकच गडद होत चालली आहे.पीएमपीएलचे शहर हद्दीत ७ डेपो आहेत. त्यापैकी हडपसर, पुणे स्टेशन, कोथरूड, कात्रज, स्वारगेट या ५ डेपोंमध्ये विकासाची कामे करण्याची गरज आहे. त्यासाठी तब्बल १३ कोटी रुपयांचा खर्च आहे. महापालिकेची वारंवार आर्थिक मदत घेणाऱ्या पीएमपीएलला हा खर्च करणे शक्य नाही. कोथरूड व बिबवेवाडी या ठिकाणी टर्मिनल बांधण्यासाठी पालिकेच्याच भवन विभागामार्फत ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. समितीच्या पुढील बैठकीत यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. मेट्रो प्रकल्पावरून सध्या पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये हमरीतुमरी सुरू आहे. त्याचा परिणाम या प्रस्तावावर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>पीआयबीपुढेच प्रस्तावया निधीशिवाय मेट्रोसाठी म्हणून सार्वजनिक वाहतूक सुधारणा व विशेष प्रकल्प या विभागाकडून अंदाजपत्रकात ६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रोला सर्व स्तरांवर मान्यता मिळाली असे सांगण्यात येत असले, तरी केंद्र सरकारच्या पीआयबी या आस्थापनेपुढेच हा प्रकल्प प्रलंबित आहे. त्यातच हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
मेट्रोच्या निधीवर डोळा
By admin | Published: August 26, 2016 12:58 AM