तरडगाव (सातारा) :याचि देही, याचि डोळाआ गा पाहिला मीमाउलींचा रिंगण सोहळा...!टाळ-मृदंगाचा गजर, मुखी माउली-माउलीचा जयघोष. रोखलेला श्वास आणि उत्सुक नजरा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला. हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी डोळ्यात साठवला.लोणंद येथील अडीच दिवसांचा मुक्काम आटोपून माउलींची वारी शनिवारी दुपारी एक वाजता तरडगावकडे मार्गस्थ झाली. फलटण तालुक्याच्या सीमेवर सरहदेचा ओढा येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. माउलींचा मानाचा नगारखाना दुपारी तीनला रिंगणस्थळी आला. तेव्हा पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. पावसातच वारकऱ्यांनी नाचण्यास सुरुवात केली. सायंकाळी चारला चांदोबाचा लिंब येथे पोहोचल्यानंतर चोपदारांनी रिंगण लावले. रिंगणाचा सोहळा याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी हजारो लोक आले होते.
डोळा साठविला रिंगण सोहळा!
By admin | Published: July 19, 2015 1:57 AM