सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिरजेत सुमारे ३४ लाखांच्या नकली नोटा जप्त केल्या तसेच दत्तवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील नोटा छपाईचा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स मशीन, कागदी बंडल जप्त केले.पोलिसांनी नोटांची छपाई करणाऱ्या दत्तवाडमधील बाप-लेकासह चौघांच्या टोळीस ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. रमेश कृष्णा घोरपडे, ऐनुद्दीन गुलाब ढालाईत, इम्रान ऐनुद्दीन ढालाईत व सुभाष शिवलिंग पाटील-सोळकुडे (सर्व रा. दत्तवाड) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. ऐनुद्दीन ढालाईत शुक्रवारी सायंकाळी मिरजेतील स्टेशन रस्त्यावरील हैदराबाद बँकेसमोर एकाला बनावट नोटा देणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने बँकेजवळ सापळा लावला. ढालाईत तेथे आला. त्याच्या हातात बॅग होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस सरसावताच त्याने बॅग टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले. पथकाने तातडीने ढालाईत यास सोबत घेऊन दत्तवाड गाठले. रमेश घोरपडे याच्या कौलारू घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत, सुभाष पाटील हे नोटांची छपाई करताना रंगेहाथ सापडले. (प्रतिनिधी) घरातच बनावट नोटांची छपाईबॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात सुमारे ३४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व एक हजाराच्या नोटा आहेत. ढालाईतची चौकशी केल्यानंतर त्याने दत्तवाडमख्ये रमेश घोरपडे यांच्या घरात नोटा छपाईचा कारखाना असल्याचे सांगितले.
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त
By admin | Published: July 12, 2015 2:41 AM