ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळ यांच्याविरोधात विशेष ईडी न्यायालयात २० हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. समीर भुजबळांविरोधात ईडी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग कायद्याखाली ईडीने आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष इडी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं.
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, पाटबंधारा खात्याशी संबंधित अनेक अधिका-यांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ व पंकज भुजबऴ यांच्यावरही ठपका ठेवला असल्याने भुजबळ कुटुंबिय अडचणीत आले आहे.
पंकज भुजबळ यांची सुनावणी शनिवारी होणार आहे, ही सुनावनी धर्मदाय आयुक्तांसमोर होणार आहे.
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमवारी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून त्यांना अटक करण्यात आली होती. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आ. पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.
भुजबळ कुटुंबावर झालेली कारवाई
१२ डिसें.२०१५ ईडीकडून प्राइम डेव्हलपर्सची चौकशी
२२ डिसेंबर : ईडीकडून वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुझमधील नऊ मजली इमारत, अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
१३ जानेवारी : भुजबळ यांना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
२८ जानेवारी : भुजबळांसह कुुटुंबीयांवर महिन्याभरात आरोपपत्र, एसीबीची हायकोर्टाला माहिती
१ फेब्रु.२०१६ : छगन भुजबळ अमेरिकेला रवाना. भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर ईडीचे छापे. समीर भुजबळची ईडीकडून दिवसभर चौकशी. समीर यांना रात्री उशिरा अटक.
२ फेब्रुवारी : भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने - शरद पवार
२४ फेब्रु. : भुजबळांवर आरोपपत्र दाखल
८ मार्च : ईडीचे छगन भुजबळ यांना समन्स, १४ मार्चला हजर राहण्याची सूचना