पुण्याच्या मित्रांनी तयार केले ‘प्रोशल’प्रोफेशनल व सोशल नेटवर्किंगला आव्हानपराग पोतदार - पुणे कामाचा रेटा सुरू असताना आपल्याला मित्रांची लुडबुड नको असते आणि मित्रांसोबत कल्ला सुरू असताना कामाचा विषय नको असतो़ पण सध्याच्या सोशल नेटवर्किंगच्या जगात हा चॉइस कुठला? जरा थांबा... पुण्यातील तरुण टेक्नोसॅव्ही मित्रांनी एकत्र येऊन त्यावर ‘रायपिन’ हा नवाच पर्याय शोधून काढलाय. फेसबुक व लिंकडिनसारख्यांना ‘काटे की टक्कर’ देऊ शकेल, असे हे पहिलेवहिले प्रोशल (प्रोफेशनल+सोशल) नेटवर्क असणार आहे.संपूर्णत: भारतीय असणारे ‘रायपिन’ हे नवे फोरम सध्याच्या सर्व सोशल नेटवर्किंगमध्ये अद्ययावत व नावीन्यपूर्ण ठरणारे आहे. पुण्यातील या पाचही मित्रांनी दीड वर्ष त्यावर काम केले. सध्याच्या सोशल नेटवर्किंगमधील अनेक त्रुटी डोळ््यासमोर होत्याच. त्या कमी करून ऐकता येणारे अपडेट्स, पर्सनल टच, अपडेट्स अशा अनेक सुविधा त्यांनी नव्या पर्यायात उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापासून ‘रायपिन’ हे पूर्णपणे अॅक्टिव्ह झालेले असेल. सद्य:स्थितीत अवघ्या पाच दिवसांत ९०० जणांनी त्यांच्या पेजला भेट दिली असून, ३०० जणांनी नोंदणीही केली आहे. तरुणाईचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्याची आणखी क्षमता विस्तारली जाणार आहे. यात नवीन काय ?लॉग इन होताच गुडमॉर्निंग, गुड डेच्या शुभेच्छा मिळणार... ई-गव्हर्नन्सचे अद्ययावत अपडेट्स मिळणार ‘स्पीक अप’ माध्यमातून दिवसभरातील अपडेट्स चक्क ऐकता येणार फेसबुकच्या लाइकला मर्यादा आहेत. त्यामुळे शेअर करता येणार.जपा स्वातंत्र्य अन् कामही या विषयी ‘लोकमत’शी बोलताना रोहन म्हणाला, की आजची तरुणाई सोशल नेटवर्किंगवर रमते हे खरं. पण त्यात अनेक त्रुटी आहेत, तसेच मर्यादाही. मला स्वत:ला त्या जाणवल्या. आपले ‘सोशल लाइफ’ वेगळं असतं आणि प्रोफेशनल जग त्याहून वेगळे़ ते एकमेकांत आपल्याला मिसळायचं नसतं. ही सुविधा सोशल नेटवर्किंगवर नाही, म्हणूनच आम्ही तयार केलंय ‘प्रोशल’ नेटवर्क. ज्यामुळे स्वातंत्र्य जपता येतं. काम आणि मित्र यांची सरमिसळ होतच नाही. ही कल्पना रोहन ठुसे या तंत्र अभियंत्याची. त्याला अनिकेत लाटे, मिहीर आंबेकर, अनिकेत ठाणगे व संकेत ढोरजे या मित्रांची साथ मिळाली. त्यांनी देशातील पहिले ‘प्रोशल’ नेटवर्किंग साकारले आहे.
फेसबुकला टक्कर
By admin | Published: January 11, 2015 2:32 AM