ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २० : फेसबुक आणि व्हॉटस अॅपचा वापर करून तरूण मुलींचे वेगवेगळे गु्रप करून त्यांना मेसेज पाठवून प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे़. श्रीशैल्य बसेय्या मरबिगी (वय २०, रा. वसगडे, ता. पलुस, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे.
श्रीशैल्य याने फेसबुकवरून सुंदर मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर प्राप्त करून त्याव्दारे मुलींचा व्हॉटस अॅप ग्रुप तयार केला होता. गु्रपवर सक्रिय राहुन त्याने काही मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला. श्रीशैल्यने सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील एका युवतीला वेळावेळी मेसेज केले आणि तिला फ्रेंडशिप कर म्हणून गळ घातली. त्याच्या त्रासाला कंटाळुन युवतीने विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना हकीकत सांगितली. त्यानंतर पासलकर आणि सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीला पुण्यात बोलविण्यासाठी त्याला काही मेसेज आणि व्हॉटस अॅप पाठविले. सिंहगड रोड परिसरात त्याला मंगळवारी बोलाविण्यात आले. सहाय्यक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विष्णु जगताप, उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे, किरण देशमुख, संदीप पवार आणि विजय पोळ यांच्या पथकाने सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले.४३० मुलींना बनविले मित्रसिंंहगड पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने तब्बल ४३० मुलींना फेसबुकवर मित्र बनविल्याचे सांगितले. या ४३० मुलींपैकी २२ते २५ मुलींना वेळावेळी मेसेज आणि व्हॉटस अॅप पाठवून प्रेमाची गळ घातली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६ सीमकार्ड जप्त केली आहेत. श्रीशैल्यने अशाप्रकारे कोणाला त्रास दिला असल्यास त्यांनी सिंहगड रोड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले