सोमेश्वरनगर : कारखाने बुडतात तेव्हा चालकाने दोन्ही खिसे भरून घेतलेले असतात. शेतकरी वाऱ्यावर सोडले जातात. प्यायला पाणी नाही, तिथे कार्यकर्ता सांभाळण्यासाठी कारखाने दिले गेले. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला गेले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. येथील मु. सा. काकडे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य, गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सतीश काकडे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. महादेव वाळुंज, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. देविदास वायदंडे, कल्याण भगत, नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, विलास बोबडे, कैलास मगर, अविनाश जगताप, दत्तात्रेय भोईटे उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, पंचवीस हजारांची सभा शक्य नसेल तर एक हजारामागे एक-दोन प्रतिनिधी घेऊन वरचेवर चर्चा करावी. अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी गुपचूप करार करतात. तेव्हा सरकार बघ्याची भूमिका घेतं. दुबळ्या लोकांकडून लिहून घेऊन एफआरपीचा कायदा मोडणारांना दरोडेखोर का म्हणू नये? व्हीएसआयमधील चर्चासत्रात चोºया उघड होतील म्हणून चळवळीतल्यांना बोलवत नाहीत, असा आरोप करत ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे आहे; अन्यथा भविष्यात ऊसतोडणीसाठी कामगार मिळणे मुश्किल होईल, असे शेट्टी म्हणाले. सतीश काकडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, चंगळवादी वृत्ती मोडून काटकसरी बनले पाहिजे. सत्तेचा माज येऊ देता कामा नये. शेतकऱ्यांची पोरे सत्तेत जाऊन शेतकऱ्यांना विसरतात. ९७ व्या घटनादुरुस्तीत बदल हवा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सर्व कारखान्यांनी प्रतिटन निधी द्यावा. या वेळी संतोष शेंडकर यांचे भाषण झाले.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, शंभर सहकारी साखर कारखाने उत्तम चालतात. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाही. यासाठी १९६० च्या जुनाट सहकार कायद्यात काळानुरूप बदल झाले पाहिजेत. ...........शेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजेशेतकऱ्यांचीच मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे. चळवळच फक्त चोऱ्यांवर अंकुश बसवते. प्रशासन घाबरवते आणि सरकारवर दबाव ठेवू शकते. तेल, तेलबिया, डाळी आयात केल्याने रुपयाचे अवमूल्यन होत आहे. शेतकºयालाच खात्रीचे पैसे दिले तर ही आयात करावी लागणार नाही. तेल कंपन्यांचा इथेनॉलच्या धोरणात अडसर आहे. मधल्यांचे खिसे भरणारी धोरणे मोडून काढली पाहिजेत. अंकुश ठेवणारा तगडा नेता केंद्रात हवा.
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:13 AM
अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात.
ठळक मुद्दे‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाहीशेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजे