रांजणगाव सांडस : भीमा व मुळा-मुठा नदीच्या काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. यात पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी ऊस गुऱ्हाळे यांना ३००० ते ३५०० बाजार भाव प्रतिटनप्रमाणे दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उसाचे हक्काचे चार पैसे मिळाले असले तरी कारखान्यांकडून मिळणारे एकरी टनेज न मिळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. सध्या उसाचे प्रमाण कमी असल्याने कारखान्यांना मात्र ऊस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दसरा व दिवाळीच्या आसपास अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत. कारण हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्याला ऊस कमी पडणार आहे. याला कारण आहे, दुष्काळजन्य परिस्थिती व रसवंतीगृह व गूळ बनविणारे गुऱ्हाळ.. त्यांनी साखर कारखान्यांपेक्षा जास्त व एकरकमी बाजारभाव दिल्यामुळे साखर कारखाने सुरू होतील तोपर्यंत ऊस ठेवला नाही. कारण कारखान्यांचा बाजार हप्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस रसवंतीगृहाला दिलेला आहे. त्यामुळे अनेक शेतामध्ये उसाचे टिपरूही शिल्लक राहिलेले नाही. सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांचा ऊस हे कारखान्याच्या क्षेत्राबाहेरील अनेक कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गळीत हंगामासाठी नेत होते. त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत नव्हती. जिल्ह्यातील साखर कारखाने बाजारभाव देण्यासाठी नेहमी स्पर्धा करत असे, परंतु अलीकडील काळामध्ये कमी झालेले पर्जन्यमान, खासगी साखर कारखानदारी तसेच मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळ मालक आणि परराज्यांतील रसवंतीगृहांकडून उसाची वाढलेली मागणी, यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला मोठी मागणी आहे. यामुळे गाळपासाठी आवश्यक असलेला ऊस पळवण्यात येऊ लागल्यामुळे कारखान्यांनाच ऊस कमी पडायला लागला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती व कारखान्यांचे बाजारभाव कमी-जास्त प्रमाणात देण्यामागचे हे कारण आहे. आजही शेतकऱ्यांना पाण्याची समस्या सोडवता आलेली नाही. चासकमानचे आवर्तन शिरूर तालुक्यात सुटल्यानंतर शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेततलाव हे धरणातील सुटलेल्या पाण्याच्या विसर्गातून भरले गेले असते तर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला असता. परंतु धरणातील अतिरिक्त पाणी हे नद्यांमध्ये सोडल्यामुळे पाणी आले. नदीला पूर आला, पूर वाहून गेला, परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाहण्यासाठी पाणी शिल्लक राहिलेले आहे. ...........चासकमान धरणाच्या पाण्याचे व घोड धरणाच्या पाण्याचे योग्य वाटपाचे नियोजन न झाल्यामुळे शिरूर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर शेतकऱ्यांनी आपला कमी वयाचा ऊस गुऱ्हाळे, रसवंतीगृहांना दिला नसता .- अशोक पवार, माजी आमदार .............सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने साखरेला हमी भाव द्यावा. शेतकरीवर्गाला यातून हक्काचे चार पैसे मिळतील. - सुधीर फराटे पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष व संचालक, घोडगंगा साखर कारखाना ............
राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 1:22 PM
दसरा व दिवाळीच्या आसपास साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत.
ठळक मुद्देदुष्काळाचा, पुराचा परिणाम : हंगामाचा ऊस नेला गुऱ्हाळ अन् रसवंतीगृहांनी