ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २९ - मुख्यमंत्री येतात आणि घोषणा करुन निघून जातात. मात्र विकास कामासाठी पैसे येत नाहीत अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली. राणे यांनी त्यांच्या शैलीत शिवसेनेचा ही समाचार घेतला, शिवसेनेचे कोकणातील नेते हे काम आम्हीच केलं, अशा अविर्भावात होते. मात्र या कामाशी त्यांचा काडीचाही संबंध नाही, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा विकास नेमका कोणत्या मार्गाने करावा, याची काहीच कल्पना शिवसेनेच्या नेत्यांना नाही असे म्हणाले.
मानवी विकास निर्देशांक, कोकणाचे दरडोई उत्पन्न आणि #GDP कसा वाढवावा, याबाबत शिवसेनेच्या नेत्यांना काहीच माहिती नाही. (३/३) #Kokan— Narayan Rane (@MeNarayanRane) January 29, 2016
महामार्गाच्या चौपरीकरणासाठी पोलीस घरात घुसून जमिनी ताब्यात घेतल्या जाणार असतील, तर कोकणात तसं होऊ देणार नाही असा इशाराही राणेंनी दिला. राणेंनी एकीकडे राज्य सरकारवर टीका केली. मात्र दुसरीकडे गडकरी शब्द पाळतात म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. युती सरकारच्या काळात मी आणि नितीन गडकरी यांनी मिळून चौपदरी रस्त्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात ठेवून आज मला भूमिपूजनाला आमंत्रित केले आहे असेही ते म्हणाले.
युती सरकारच्या काळात मी आणि @nitin_gadkari मिळून चौपदरी रस्त्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात ठेवून आज मला भूमिपूजनाला आमंत्रित केले. (१/२)— Narayan Rane (@MeNarayanRane) January 29, 2016