शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:47 PM

कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यां प्रादेशिक राजकारण मोडून काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात निवडणूक होणार नाही, अशी व्यक्त होणारी भीती निरर्थकमहाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यताराफेल मुद्दा लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये

पुणे : ‘‘मोदी विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताच राष्ट्रीय मुददा नसल्याने त्यांचा प्रचार स्थानिक पातळीवरच सुरू आहे. कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही. राहुल गांधी यांची स्विकारार्हता कमी आहे. काँग्रेसचा जाहिरनामा चांगला असला तरी तो जनतेपर्यंत पोहोचवायला कोणी नाही,’’ असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले. भाजपाच्या जागा २२० पेक्षा कमी निवडून आल्या तरच त्रिशंकू अवस्था निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘2019 ची निवडणूक समजून घेताना’ या विषयावर पळशीकर बोलत होते. संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि सरचिटणीस पांडुरंग सांडभोर यावेळी उपस्थित होते.

भाजपच्या प्रचार रणनितीविषयी बोलताना पळशीकर म्हणाले, की 2014च्या निवडणूकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक राजकारण मोडून काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक राष्ट्रीय मुद्यांवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. या विषयांवर बोलण्यासाठी पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांकडे मुद्दे नसतात. या रणनितीपुढे प्रादेशिक पक्षांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागते. बिजु जनता दलाच्या नवीन पटनायक यांना केंद्रातल्या निवडणुकीसाठी तुम्ही हवा तो विचार करा, राज्यात मात्र आम्हाला मत द्या, असे आवाहन करावे लागते, यावरुन हे स्पष्ट होते. हिंदूत्त्व, राष्ट्रवाद, सुरक्षा या प्रश्नांपुढे प्रादेशिक अस्मिता बाजूला ठेवा, हे ठसवण्याचा मोदींचा प्रयत्न असतो. मोदींच्या निवडणुकीच्या प्रचाराची विकास, राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद ही त्रिसूत्री आहे. केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणे अवघड जाईल हे मोदींना माहिती आहे. देशापुढचे प्रश्न जटील असून ते सोडविण्यासाठी देवदूत आला असल्याचे भावनिक वातावरण निर्माण करण्यात मोदींना २०१४ मध्ये यश आले. त्यांच्या या प्रतिमेला अद्यापही तडा गेलेला नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत आणि भारताबददल आमच्या खेरीज कुणालाच प्रेम नाही हे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवले आहे. त्यामुळे ‘पुलवामा'तला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेतला गलथानपणा होता, यापेक्षाही राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात आहे, त्यानंतर हवाई हल्ले करुन कसे प्रत्युत्तर दिले, हेच सूत्र जनमानसात रुजवण्यात मोदी यशस्वी ठरले. मात्र निवडणूका टप्प्यांमध्ये होणार असल्याने याही मुद्यांचा प्रभाव आता ओसरला आहे, याकडेही पळशीकर यांनी लक्ष वेधले.  ...................पळशीकर म्हणतात* राफेल मुद्दा लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. ‘काहीतरी झालं असेल पण मोदींनी काही केले नाही,' हीच मतदारांची मानसिकता आहे.* मनसेचे नेते राज ठाकरे आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्यावर मर्यादा आहेत.* ‘मोदी पंतप्रधान व्हावेत,’ असे भाजपाचे नसलेल्या मतदारांनाही वाटते. समर्थक यांना वाटते. ‘दुसरे कोण आहे,' अशी संभ्रमाची अवस्था त्यामागे आहे. हा भाजपासाठी ‘प्लस पॉईंट’ आहे * उत्तरप्रदेशात भाजपच्या 30 ते 40 जागा कमी होऊ शकतात. निरर्थक भीतीमोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात निवडणूक होणार नाही, अशी व्यक्त होणारी भीती निरर्थक असल्याचे मत पळशीकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जे मोदी दोन निवडणुका जिंकू शकतात ते तिसरी निवडणूकही जिंकू शकतील. मग त्यांनी निवडणूक न घेण्याचे कारण काय?‘बहुजन वंचित’चा फटका काँग्रेस आघाडीला?         महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढण्यामागे प्रकाश आंबेडकरांचे विधानसभेचे गणित असू शकते. वंचित आघाडीतल्या एमआयएमसोबत कॉंग्रेस गेली असती तर त्यांच्यासाठीही तो आत्मघात ठरला असता. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक