शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

नालासोपारा स्थानकात पाणी साचलेल्या रुळांवरुन 'बुलेट'च्या स्पीडनं धावलेल्या एक्स्प्रेसला विरार स्टेशन मास्टर जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 12:04 PM

पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून बुलेटप्रमाणे भरधाव एक्स्प्रेस चालवल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नालासोपारा - पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून बुलेटप्रमाणे भरधाव एक्स्प्रेस चालवल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी विरार स्टेशन मास्टर आणि पी. वे. विभागाच्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने वेग कमी ठेवण्याची माहिती एक्स्प्रेसच्या लोको पायलटला न दिल्याने विरार स्टेशन मास्तर बिपीनकुमार सिंह आणि पी. वे. विभागाचे अधिकारी शेख अब्दुल रहीमवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?मुंबई शहरात 20 सप्टेंबर रोजी जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होते. या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मुंबईतील जोरदार पावसाव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकावरील एक्स्प्रेसचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. नालासोपारा स्थानकातून जलदगतीनं जाणा-या एक्स्प्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर बुधवारी तुफान व्हायरल झाला होता.  या व्हिडीओमध्ये, मुंबईत झालेल्या पावसामुळे नालासोपारा स्थानकात रुळावर पाणी साचलेले आहे. मात्र, साचलेल्या पाण्यातूनही मोटरमननं ही एक्स्प्रेस बुलेटप्रमाणे चालवल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरसह फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर हा व्हि़डीओ 'सुपरफास्ट' गतीने व्हायरल झाला होता. या व्हिडीओबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारलं असता, त्यांनी व्हिडीओतील नेमके रेल्वे स्थानक आणि एक्स्प्रेस ओळखणे शक्य नसल्याचे सांगितले होते.

नेमके काय घडले नालासोपारा स्थानकात?20 सप्टेंबरच्या दिवशी, नालासोपारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वर जलदगतीने एक्स्प्रेस आली व  रेल्वे रुळावर साचलेले पाणी फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडाले. स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाइल कॅमे-यामध्ये कैद केला. मुळात रुळावर पाणी असतानादेखील जलदगतीने एक्स्प्रेस घेऊन जाणे, हे धोकादायक आहे. हा व्हिडीओ पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या घटनेबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारले असता त्यांनी स्थानक व एक्स्प्रेस ओळखणं शक्य नसल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही असतानादेखील रेल्वे प्रशासनाला या घटनेचा 12 तासांनंतरही छडा लावणं शक्य झालं नव्हतं. . यामुळे पूर्ण स्थानकाच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.   

प्रशासन म्हणालं होतं 'स्थानक/एक्स्प्रेसची ओळख पटलेली नाही'जलद गतीनं जाणा-या एक्स्प्रेसची ही घटना बुधवारी सकाळी पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर घडलेली आहे. मात्र नेमके रेल्वे स्थानक आणि एक्स्प्रेसची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली होती.

'स्थानकाची ओळख पटली नाही म्हणणं चुकीच'मुळात मुंबईमधील रेल्वे स्थानकामधील अनेक प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमाने उघडकीस येतात. वृत्तवाहिन्यामध्ये दिसत असताना देखील रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही नाही, स्थानकाची ओळख पटलेली नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. - समीर झवेरी , रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता  

 

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वे