ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 31 - महापालिकेच्या निवडणुकीत या वेळी चार उमेदवारांना मतदान करावयाचे आहे. यात मतदारांचा गोंधळ होऊ नये म्हणून उमेदवाराला नकली ईव्हीएम तयार करून त्याद्वारे मतदारांना माहिती देण्याची मुभा देण्यात आली आहे. सोबतच डमी मतपत्रिकाही छापण्याची मुभा देण्यात आली आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ५ फेब्रुवारीला अर्ज मागे घेतल्याची मुदत संपल्यानंतर रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. ६ फेब्रुवारीला उमेदवारांचे चिन्ह व ईव्हीएमवरील क्रमांक निश्चित करून अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर ईव्हीएमवर आपले नाव कोणत्या क्रमाकांवर आहे, हे उमेदवाराला स्पष्ट होईल. या माहितीच्या आधारे उमेदवाराला मतदारांमध्ये आपला प्रचार प्रसार करण्यासाठी नकली बॅलेटिंग युनीट (ईव्हीएम) तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, हे नकली युनिट लाकडी, प्लास्टिक किंवा प्लायवूडची असावीत. एवढेच नव्हे तर नकली ईव्हीएमच्या आकाराबाबतही बंधन घालून देण्यात आले आहे. नकली ईव्हीएम खऱ्या युनीटच्या अर्ध्या आकाराचे असावे. शिवाय खऱ्या युनीटवरील मतपत्रिकेत वापरण्यात येणारे रंग वगळून दुसऱ्या रंगात तयार केली मतपत्रिका त्यावर लावता येईल. उमेदवाराला डमी मतपत्रिकाही छापता येईल. मात्र, मतपत्रिकेवर त्याला निश्चिक क्रमाकांवर स्वत:चे नाव व चिन्ह छापण्याची मुभा असेल. इतर उमेदवारांचे नाव किंना चिन्ह प्रकाशित करता येणार नाही. प्रचारासाठी इतर उमेदवारांच्या नावाचा वापर केला जात आहे असे आढळून आले व तशी तक्रार झाली तर प्रकाशकाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.फेरमतमोजणी होणार नाही- महापालिकेच्या निवडणुकीत फेरमतमोजणी होणार नाही, असे नागपूर महापालिकेने निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेत पृष्ठ क्रमांक १६ वर अनुक्रमांक १६ मध्ये नमूद केले आहे. साधारणत: मतमोजणीनंतर अत्यंत कमी फरकाने किंवा अनेपिक्षत पवारभव झाला किंवा मतमोजणीत चूक झाली असे वाटल्यास उमेदवार त्यावर आक्षेप घेऊन फेरमतमोजणीची मागणी करतात. बऱ्याचदी अशी मागणी मान्यही केली जाते. मात्र, निवडणूक नियमात फेरमतमोजणीच तरतूद नसल्याने याबाबतची काणाचाही व कोणतिही विनंती मान्य केली जाणार नाही, असे पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक १७ (१) मध्ये मात्र, निवडणुकीसंबंधी अचडण उद्भवल्यास महापालिका आयुक्त यांनी दिलेला निर्णय अंतिम राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उमेदवाराला प्रचारासाठी नकली ईव्हीएमची मुभा
By admin | Published: January 31, 2017 9:30 PM