सोशल मीडियात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यात प्रत्येक व्हिडिओ खरा असतोच असं नाही. अनेकदा वेगळ्याच ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल करुन एखाद्या ठिकाणाची किंवा परिस्थितीची चुकीची माहिती पसरवली जाते. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे.
कोल्हापुरच्या घाटमाथ्यावरुन कोकणातील दाजीपूर अभयारण्यातून खाली उतरणाऱ्या फोंडा घाटात दरड कोसळल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला जात आहे. पण यामागची सत्यता तपासून पाहण्यात आली असता सदर व्हिडिओ खोटा असून त्याचा फोंडा घाटाशी कोणताही संबंध नसल्याचं उघडकीस आलं आहे.
फोंडा घाटात सध्या कोणतीही दरड कोसळलेली नसून याठिकाणची वाहतूक सुरळीत व सुरक्षितरित्या सुरू आहे. व्हायरल करण्यात येत असलेला व्हिडिओ केरळमधील असल्याचं संशय व्यक्त करण्यात येत आहे.