लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : सोने-चांदीच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण होऊन गुरुवारी (दि. २४) चांदीचे भाव तीन हजार रुपयांनी गडगडून ती ५८ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे. तीन दिवसात तर चांदीत दहा हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
सोने-चांदीची खरेदी करून त्यांचे भाव अचानक वाढविणे व नंतर पुन्हा विक्रीचा मारा करणे या सट्टेबाजारातील प्रकारामुळे सुवर्ण बाजार अस्थिर झाला आहे.यात २१ सप्टेंबर रोजी ६८ हजार रुपये प्रतिकिलोवर असलेल्या चांदीच्या भावात २२ सप्टेंबर रोजी सहा हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. त्यानंतर गुरुवारी (दि. २४) पुन्हा त्यात तीन हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ५८ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात तीन दिवसांपासून घसरण होत असून, गुरुवारी सोने ५० हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर आले.सट्टा बाजारातील खरेदी-विक्रीच्या माºयामुळे सोने-चांदीच्या भावात सातत्याने उतार-चढ होत आहे. या अस्थिरतेमुळे सुवर्ण व्यावसायिकही चिंतित आहेत.- अजयकुमार ललवाणी,अध्यक्ष, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन