ठळक मुद्देउमेदवारांच्या घरामध्ये या निवडणुकीत अगदी एखाद्या लग्नकार्यासारखं वातावरणसर्वच जण सकाळी लवकर घराबाहेर पडून लगबगीने कामाला लागतातपदयात्रा, भेटीगाठी, कॉर्नर सभांमध्ये उमेदवारांचे नातेवाईक गुंतले आहेत
सोलापुरातील अनेक उमेदवारांच्या सोबतीला त्यांचे परिवारातील सदस्य त्याच उत्साहाने प्रचाराची मोहीम राबवताना दिसत आहेत. उमेदवारांच्या घरामध्ये या निवडणुकीत अगदी एखाद्या लग्नकार्यासारखं वातावरण आहे. सर्वच जण सकाळी लवकर घराबाहेर पडून लगबगीने कामाला लागतात. पदयात्रा, भेटीगाठी, कॉर्नर सभांमध्ये उमेदवारांचे नातेवाईक गुंतले आहेत. घरातील मंडळी प्रचारात उतरल्यामुळे प्रचाराचा ताण कमी होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
संजय कोकाटे - माढा विधानसभा मतदारसंघ
- पत्नी सविता : या त्यांच्या नातेवाईक सूरजा बोबडे व महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघातील खेडोपाडी जाऊन महिलांशी संवाद साधून प्रचार करीत आहेत़ महिला मतदारांना त्या पक्षाचे चिन्ह दाखवून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
- भाऊ विकास : पेशाने वकील आहेत़ त्यांनी ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन प्रचार यंत्रणा राबवित आहेत़
- दुसरे बंधू सतीश : कोकाटे पेशाने बिल्डर असून, उमेदवार संजय कोकाटे यांच्या आर्थिक विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
- नितीन गायकवाड : हे संजय कोकाटे यांचे नातेवाईक असून दैनंदिन खर्च, सभेचे परवाने काढणे व प्रचार यंत्रणेची जबाबदारी सांभाळत आहेत.
प्रणिती शिंदे - विधानसभा मतदारसंघ शहर मध्य
- वडील सुशीलकुमार शिंदे : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवडणूक लढविण्याचा दीर्घ अनुभव आहे. मतदारांना समजावून घेऊन त्यांना आकृष्ट करण्याचे त्यांच्याकडे कौशल्य आहे. आता ते कन्येसाठी मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ मान्यवरांची मोट बांधण्याचे काम करतात़ प्रचार मोहिमेचा कार्यक्रम त्यांच्याच नियोजनाखाली सुरू आहे़ सभा, मार्गदर्शन करण्याचे काम करताहेत़
- आई उज्ज्वला शिंदे : महिलांमध्ये जाऊन त्यांच्याशी हितगुज साधताहेत़ महिलांच्या बैठका, सभा घेत आहेत़ पदयात्रेत देखील त्यांचा सहभाग आहे़
- भगिनी स्मृती आणि प्रीती : अद्याप प्रचारात सहभाग नाही़ लवकरच उतरतील, अशी माहिती आहे़
दिलीप माने - विधानसभा मतदारसंघ शहर मध्य
- पत्नी जयश्री : या महिलांच्या संस्था, संघटनांना भेटी देताहेत़ झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन महिला वर्गाशी संवाद साधताहेत़ श्रमिक महिलांच्या घरी बैठका घेऊन त्यांच्यात मिसळून त्यांचा पाहुणचार घेताहेत़
- मुलगा पृथ्वीराज : हे सोशल मीडिया आणि इतर प्रचाराची सर्व सूत्रे सांभाळताहेत़ युवकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधताहेत़
- भाऊ जयकुमार माने : माणसं आणि संस्था, संघटना जोडण्याचे काम युद्धपातळीवर करताहेत़ इतर सदस्यांच्या प्रचार मोहिमेवर यांचे नियंत्रण आहे़
- पुतण्या धनंजय भोसले : दिलीप माने यांच्या सर्व संस्थेतील कर्मचाºयांवर देखरेख आणि इतर सर्व प्रचार यंत्रणा सांभाळताहेत़
संजय शिंदे - विधानसभा मतदारसंघ करमाळा
- पत्नी : गृहिणी, घरकामात व्यस्त
- भाऊ रमेश : हे कुर्डूवाडी शहरासह ३६ गावातील मतदारांच्या दररोज गाठीभेटी व प्रचारयंत्रणेवर बारकाईने लक्ष देतात़
- मुलगा यशवंत : दररोज सकाळी ९ वाजल्यापासून मतदारसंघातील विविध गावांना भेट देऊन संवाद साधतो. विशेषत: युवक मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि वडिलांनी झेडपी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची माहिती करून देणे़
- पुतण्या धनराज : चुलते संजयमामांच्या प्रचारात सक्रिय सहभागी असतात़ ते सकाळपासून ते रात्री १० वाजेपर्यंत मतदारसंघात फिरून मतदान करण्याचे आवाहन करतात़ मतदारांच्या अडीअडचणी समजावून घेतात़
नागनाथ क्षीरसागर - विधानसभा मतदारसंघ मोहोळ
- मुलगा सुशील : नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचारामध्ये शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांच्या, प्रमुख पदाधिकाºयांच्या गाठीभेटी व सभांचे नियोजन करणे़
- मुलगा सोमेश : कार्यकर्त्यांशी चर्चा करून बैठक घेणे़ मतदारसंघातून आलेल्या प्रमुख पदाधिकाºयांच्या गाठीभेटी.
- बंधू संजय : उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये प्रमुख गावात सहभाग घेऊन सभा घेणे व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, दौरा नियोजन.
- बंधू गोरख : क्षीरसागर यांच्या प्रचार दौºयामध्ये कार्यकर्त्यांबरोबर सुसंवाद साधणे़
- मुलगी कीर्ती (खांडेकर) : महिला कार्यकर्त्यांसोबत हळदीकुंकू, गाठीभेटीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन महिलांशी संवाद.