श्यामकुमार पुरे / ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 9 - हात पाय नसलेले व हात पाय चांगले असताना भीक मागणारे लोक आपण पाहिले... तर पारावर दिवसभर रिकाम टेकड्या गप्पा मारणाऱ्याचीही कमी नाही...लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी रस्त्यावर बैल रसवंती ओढताना आपण पाहिले पण वडिलांनी सुन व मुलाला जोत्याला जुंपले व जनावरांसारखे अख्खं कुटुंब राबताना सिल्लोड वासियानी पाहिले...पोटासाठी जानावरा सारखे राबनारे कुटुंब बघुन सिल्लोड वासियांचे डोळे पाणावले.....
भर उन्हात रस्त्यावर फिरून रसवंती चालवणारे हे कुटुंब नागरजिल्ह्यातील रा.हसराल सैदापुर ता.पाथर्डी येथील आहे... भाऊराव बाबुराव केदार वय 65 (वडील),अंबादास भाऊराव केदार वय 35 (मुलगा), संगीता अम्बादास केदार(सुन),बाळासाहेब अम्बादास केदार (नातू) सर्व रा. हसराल सैदापुर ता.पाथर्डी जि. नगर येथील आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी ते गेल्या आठवड्या पासून सिल्लोड शहरात आले आहे. रसवंती थाटण्यासाठी जागा न बघता ते चालती फिरती रसवंती चालवतात. रसवंतीला इंजन...इंजन ला डिझेल...बैल घेतला तर त्याला ही खर्च लागेल म्हणून त्यांनी चक्क जोत्याला मुलगा व् सुनेस जोतले...अन रस विक्रीचा व्यवसाय सुरु केला.. बघायला चांगले वाटत नसले तरी त्यांची अवस्था बघुन नागरिक रस पिताना दिसत होते.
हे कुटुंब सिल्लोड शहरात गेल्या आठवड्या पासून आले असून दिवसभर शहरात फिरूंन ऊस व खर्च वजा जाता 600 ते 800 रूपये कमावतात. शहरात हॉटल मध्ये आपन इंजन वर चालणाऱ्या रसवंत्या बाघितल््या...काही वेगळे आकर्षण वाटावे म्हणून आता लोकांनी जळगाव औरंगाबाद, सिल्लोड जालना रस्त्यावर बैल जोतून अनेक ठिकाणी झाड़ा खाली रसवन्ती सुरु केली आहे. मोठ मोठे कार मालक वेगळे पण म्हणून रस्त्यावर रस घेतात...
पण स्वतःच्या मुलाला व सुनेला जोत्याला जुपुन रसवंती चालण्याची ही शक्कल वेगळेपण दाखवण्यासाठी नव्हे तर खरच पोटाची खळगी भरण्यासाठी वापरली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
चार महिने रोजगार मिळतो...
साहेब गावाकडे काम नाही...लोकांकडे मोल मजूरी करण्यापेक्षा स्वताचा व्ययवसाय सुरु केला. मुलगा व सुनेला जोत्याला जुम्पने चांगले वाटत नाही पण काय करावे पेट के लिए करना पड़ता है.
- भाऊराव बाबुराव केदार रा. हसराल सैदापुर ता.पाथर्डी जि. नगर.
काम करण्यात लाज वाटत नाही...
साहेब कष्ठ करुण रोजगार मिळविन्यात वेगळाच आनंद मिळतो... झोप शांत लागते..या कामातुन पोटाची खळगी भरण्या पुरते पैसे मिळतात... काम करण्यात लाज वाटत नाही...
- संगीता अम्बादास केदार रा. हसराल सैदापुर ता.पाथर्डी