पुणे : आधुनिक जोडप्यांची गरज लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील जोडप्यांना केवळ एक रुपये या दरात कुटुंबनियोजनाची साधने उपलब्ध करुन दिली जात आहेत. ही साधने कुटुंबांना त्यांच्या घरपोच मिळत असून ती आंतरराष्ट्रीय स्तराची असल्याचे राज्याचे कुटुंब कल्याण विभागातील सहाय्यक संचालक डॉ. एन.डी. देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, ही सर्व सामग्री केंद्र शासनाकडून आलेली असून आकर्षक पॅकींग आणि उत्तम दर्जा असलेले ३ निरोध केवळ एक रुपये इतक्या दरात उपलब्ध आहेत. याबरोबरच संततीनियमनाच्या तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या २८ गोळ््यांचे पाकीटही केवळ एक रुपयाला राज्यशासनाने उपलब्ध करुन दिले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडे या साधनांची मागणी झाल्यास नागरिकांना ती मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. ही योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येत असून ग्रामीणनंतर शहरी भागात ही सुविधा राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)दोन अपत्यांनंतर महिलांनी तात्पुरती गर्भनियोजन म्हणून ही तांबी बसवावी यासाठी समुपदेशन करण्यात येते. २०१४ या वर्षासाठी ३ हजार महिला इतके तांबी बसविण्याचे उद्दिष्ट होते, तर २०१५ साठी हे उद्दिष्ट ३० हजार करण्यात आले. यावर्षी हे उद्दिष्ट २ लाख करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रसूतीनंतर ४८ तासांच्या आत ही तांबी बसविण्यात येते. यामुळे महिलेला पुन्हा पुन्हा रुग्णालयात यावे लागत नाही.- डॉ. अर्चना पाटील,अतिरिक्त आयुक्त, कुटुंब कल्याण
कुटुंबनियोजन एक रुपयात !
By admin | Published: July 12, 2016 3:58 AM