बीड - परळी, तालुक्यातील बोधेगाव येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ढगफुटी सारखा पाऊस झाला.आणि या मुळे बोधेगावच्या ओढ्यास पाणी आले. ओढ्याच्या पाण्यात अडकलेल्या एका कार मधील तिघांना आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून बोधेगाव चे माजी सरपंच व परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे संचालक माऊली गडदे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला.बोधेगाव जवळील ओढ्यातील पाण्यात कार फसली आणि त्या मध्ये सिझर झालेली महिला, पाच दिवसाचे बाळ व एक महिला होते .या कारमध्ये स्टीरिंग पर्यंत पाणी साचले होते. कारमध्ये महिला व पाच दिवसांच्या बाळासह आई कारच्या टपावर थांबलेले होते .अशा अवस्थेत माऊली गडदे यांनी पाऊस चालू असताना आपल्या स्वतच्या कार मध्ये जीवाची परवा न करता मदतीला धावून गेले..व बोधेगावच्या ग्रामस्थांना बोलविले..ट्रॅक्टर मधून लोक मदतीला धावले. ओढ्याच्या पाण्यात येवून त्या तिघाना सुखरूप बाहेर काढले.. कार रात्री झाडाला बांधूनच ठेवली..गुरुवारी पहाटे ओढ्याचे पाणी ओसरले..अंबाजोगाई येथील रुग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाला घेऊन आई व एक महिला बोधेगाव मार्गे स्वतः कारने आपल्या कासार बोडका या गावी जात असताना त्यांना पावसाने बोधेगाव जवळ झोडपले. ही माहिती सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांना विघ्ने यांना समजली. विघ्ने यांनी बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली गडदे यांना फोन करून त्या कुटुंबांना वाचविण्याचे आवाहन केले व माऊली गडदे यांनी स्वतः पहिल्यांदा जाऊन घटनास्थळी आरडाओरडा करुन गावकऱ्यांना बोलून घेतले व गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना मदत कार्य केले.
बोधेगाव परिसरात बुधवारी रात्री तुफान पाऊस झाला, आपण पहिल्यांदाच एवढा मोठा स्वरूपाचा पाऊस पाहिला .या पावसाच्या पाण्यात एक कार अडकली होती .कार मध्ये तिघेजण होते या तिघांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.- माऊली गडदे( माजी सरपंच बोधेगाव.परळी)