शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

पानसरे स्मृतिदिनानिमित्त ‘निर्भय बनो’ फेरी

By admin | Published: June 20, 2016 2:33 PM

संपविला देह जरी.संपणार नाही मती.धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती.! असा आवाज सोमवारी कोल्हापुरात निघालेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या निर्भय बनो फेरीमध्ये दुमदुमला.

धर्माच्या गारद्यांनो.कशी रोखणार गती.!
कोल्हापुरात पुरोगामींची विचारणा :
 
ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. २० -  संपविला देह जरी.संपणार नाही मती.धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती.! असा आवाज सोमवारी कोल्हापुरात निघालेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या निर्भय बनो फेरीमध्ये दुमदुमला. निमित्त होते, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ निघालेल्या निषेध फेरीचे. 
 
दरमहा शिवाजी विद्यापीठात निघणारी ही फेरी प्रथमच पानसरे यांच्या निवासस्थानापासून शिवाजी चौकार्पयत काढण्यात आली. त्यामध्ये सामाजिकचळवळीतील लोक मोठय़ा संख्येने उस्फूर्तपणो सहभागी झाले.सागरमाळ परिसरातील पानसरे यांच्या घरापासून सकाळी सात वाजता हे फेरी सुरु झाली. ती यादवनगर,गोखले कॉलेज,सावित्रीबाई फुले रुग्णालय,आझाद चौकातून बिंदूचौक मार्गे शिवाजी चौकात आली. 
 
या दरम्यान ‘लाल सलाम. लाल सलाम’गोविंद पानसरे को लाल सलाम.लढेंगे तो जितेंगे..अशा घोषणा देण्यात आल्या. रणजित कांबळे, कृष्णात कोरे आदींनी चळवळींतील गाणी गात फेरीमध्ये चैतन्य आणले. पुरोगामी विचारांचा हा जागर ऐकून शहरवासियांचीही उत्सुकता ताणली. ही फेरी शिवाजी चौकात आल्यावर तिथे पानसरे-दाभोलकर व कलबर्गी यांचे स्मरण करणा:या घोषणा देण्यात आल्या.
 
यावेळी शिवशाहीर राजू राऊत व त्यांच्या सहका:यांनी पोवाडा म्हटला. रसिया प डळकर हिने इसलिय हम राह संघर्ष की चुने..हे गाणे म्हटले.फेरीमध्ये दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, नामदेव गावडे, उदय नारकर,एस.बी.पाटील,धनाजीराव जाधव, प्रा. रणधीर शिंदे, डॉ.चैतन्य शिपूरकर, निहाल शिपूरकर,सुजाता म्हेत्रे, प्रा. विलास पवार, छाया पवार, तनूजा शिपूरकर,सीमा पाटील, उमेश पानसरे, उमेश सुर्यवंशी, रमेश वडणगेकर,आर्किटेक्ट जीवन बोडके, सतिश पाटील, आदित्य खेबूडकर आदी सहभागी झाले.
 
पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : मेघा पानसरे
मेघा पानसरे यांनी या हत्याप्रकरणी सध्या सुरु असलेल्या तपासाबद्दल माहिती दिली. पानसरे हत्येचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. परंतू त्यांच्याकडून अजूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारने ती तयारी न दर्शवल्यास 23 जूनच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाकडे ही मागणी करणार असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले. या तिन्ही हत्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून जे म्हणत होतो, त्याच सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीसारख्या संस्थांचा सहभाग स्पष्ट होत आहे. परंतू पोलिसांना त्याबद्दल माहिती देवूनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप श्रीमती पानसरे यांनी केला.