शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

शेतकरी, आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे व्रत

By admin | Published: March 14, 2016 2:29 AM

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकरी, गोरगरीब आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे

नाशिक : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकरी, गोरगरीब आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. ही केवळ एक जबाबदारी नसून व्रत असल्याने प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने आपली भूमिका प्रामाणिकपणे जोपसाली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी येथे केले. राज्य अध्यक्ष पारस ओस्तवाल, नंदकिशोर साखला, हस्तीलाल बंब, अमर गांधी, सुभाष घिया, संतोष मंडलेचा, सुनील चोपडा, रोशन टाटीया, ललित सुराणा हे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे होते. पारख म्हणाले, सर्व समाजहित आणि राष्ट्रनिर्मिती डोळ््यासमोर ठेवून भारतीय जैन संघटनेने विविध योजना, उपक्रम हाती घेतलेले आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्हे व यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची २७७ मुले व अमरावतीच्या मेळघाट, ठाणे जिल्ह्यातील कोसवाड येथील आदिवासींची सुमारे ३२२, अशी एकूण ६०० मुला-मुलींची शिक्षणाची जबाबदारी सध्या भारतीय जैन संघटना सांभाळत आहे. दरवर्षी नवीन ५० विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली जाते. पुण्याच्या वाघोली येथे पाचवी ते बारावीपर्यंतच्या एक हजार विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी २०१४-१५ या कालावधीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा सर्व्हे करून १५ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा, असे आवाहनही पारख यांनी केले. सदर अहवाल शासनाला सादरकरून जास्तीत जास्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व आदिवासींपर्यंत शिक्षणाची संधी पोहचविण्याचा मानस असल्याचेही पारख म्हणाले. आठ वर्षांपासून जैन संघटनेने ‘बेटी बचाव’ उपक्रम हाती घेतला आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींबाबत ‘युवती सक्षमीकरण’ उपक्रमही राबविला जात आहे. भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष पारस ओस्तवाल म्हणाले की, भारतीय जैन संघटनेसारखी ताकद, कार्यकर्त्यांची फळी सर्वांकडे असून सर्व समाजाने राष्ट्रनिर्मिती समजून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमर गांधी यांनीही या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)