ऑनलाइन लोकमत
पिंपळगाव बसवंत (नाशिक), दि. 28 - निफाड तालुक्यातील दिक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंब बाग आज सकाळी तोडली.दिक्षी येथील हेमंत चौधरी हे पदवीधर शेतकरी असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती करण्यास सुरूवात केली. सन २०१३ पासुन नवीन काही तरी शेतीत करावे या उद्देशाने डाळिंब बाग लावली. सुरवातीला तीन एकर डाळिंब लावले. शासनाच्या फळरोप वाटीकेतुन भगवा जातीचे रोपे घेतली मात्र सदरचे रोपेही अत्यंत कमी दर्जाचे व भेसळ निघाल्याने एक वर्ष वाया गेले. या भागात गेली दहा वर्षे कृषी सहायय्यक नसल्याने शेततळे हे स्वत:चे खर्चाने केले. वीस लाख रु पये स्व:त खर्च करून पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभे केले तसेच डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ केली. मात्र दरवर्षी उत्पादनवर आधारित बाजारभाव मिळत नव्हता. शेतकरी व ग्राहक यांच्या भावात मोठी तफावत होती. दरवर्षी भावात होत असलेली घसरण तसेच व्यापाऱ्यांनी घेतलेला माल व ग्राहकाला विकलेला यात फार मोठा फरक पडत होता. उत्पादनावर आधारित आजपर्यंत दर हा मिळाला नाही. उलट उत्पादन घेताना दरवर्षी खर्च वाढत गेला. त्यामुळे दरवर्षी तोट्यात चाललेला शेती व्यवसायाला वैतागून तसेच सर्व शेतकरी वर्गानी एक तारखेचा संपाचा निर्णयावरून फक्त स्वत: पुरतेच पिकवायचं यासाठी तीन एकर डाळींब तोडण्याचा निर्णय घेतला. ------------------------------------२० एकर डाळिंब व १४ एकर द्राक्ष शेती आहे. तो प्रत्येक वर्षी थोडे थोडे बाग कमी करून स्वत: ग्राहकांपर्यंत पोहोचविण्या प्रयत्न करणार असून व्यापारी व अडतदार, दलाल यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थाबण्यिाचा प्रयत्न करणार आहे.- हेमंत चौधरी, दिक्षी, नाशिक