राजेश पुरी, ढाणकी (यवतमाळ)नोटाबंदीला तीन महिने लोटले, तरी बँकांमधील ग्राहकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. पैशासाठी रांगेत तासन्तास उभ्या असलेल्या एका वृद्धाचा हृदयघाताने मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या ढाणकीच्या स्टेट बँक शाखेत मंगळवारी दुपारी घडली. भाऊराव गोविंदा पाईकराव (६२) असे या वृद्धाचे नाव असून, ते ढाणकीतील रहिवासी आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता ते स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. बराच वेळपर्यंत त्यांचा नंबर लागला नाही. तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. नोटाबंदीचा जिल्ह्यातील हा तिसरा बळी ठरला आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्याचा स्टेट बँकेतील रांगेत मृत्यू
By admin | Published: February 08, 2017 5:12 AM