फुलंब्री (जि. औरंगाबाद) : मला कर्ज फेडणे शक्य नाही, भावा ते सांभाळून घे, असे लहान भावाला फोनवर सांगत रामेश्वर तेजराव लहाने या तरुण शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी आपल्याच शेतात विष प्राशन करीत आपले जीवन संपवले.
त्याने फोन केल्यानंतर कुटुंबात सर्वांचीच धांदल उडाली व विष प्राशन केलेल्या रामेश्वरला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पीरबावडा परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होत असल्याने रामेश्वर चिंतेत होता. त्याला आई -वडील दोन भाऊ व चार बहिणी आहेत व फक्त सहा एकर कोरडवाहू शेती आहे. त्यातच कोरोना संकटात एका बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतले. आता अवकाळी पावसामुळे कर्जाची फेडण्याविषयीची चिंता त्याला सतावत होती. या चिंतेतूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.