शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: July 21, 2016 10:31 PM

जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील कान्हा येथील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या तगाद्याला व बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतात लिंबाच्या झाडाला

ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. 21 - जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील कान्हा येथील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या तगाद्याला व बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतात लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ जुलैच्या पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.कान्हा येथील पांडुरंग चिभडे या शेतकऱ्याचे मराठवाडा ग्रामीण बँकेचे कर्ज पुनर्गठन, हैदराबाद बँकेचे कर्ज पुनर्गठन झाले नव्हते. यामुळे पांडुरंग चिभडे हे अस्वस्थ होते. चिभडे यांनी खाजगी सावकार तात्याराव चव्हाण याच्याकडून २५ हजार रुपये घेतले होते. २० जुलै रोजी तात्याराव चव्हाण व अन्य दोन जणांनी चिभडे यांच्याकडे शेतात येऊन पैशांची मागणी केली होती. बुधवारी रात्री पुन्हा चव्हाण पैशांची मागणी करीत होते. पैसे नसल्याचे सांगताच चव्हाण यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली. यावेळी रामकिशन चिभडे, शिवाजी चिभडे यांनी झालेले भांडण सोडविले. त्यावेळी चव्हाण यांच्याकडून चिभडे यांना धमक्या देण्यात आल्या. २० जुलैच्या रात्री पांडुरंग चिभडे यांनी शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला फाशी घेतली. ही बाब २१ जुलै रोजी सकाळी रामकिशन चिभडे यांच्या निदर्शनास आली. यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एस़एस़ खान, पोलिस जमादार हेमराज नैतम, जगताप यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला़ या प्रकरणी रुख्मिणबाई चिभडे यांच्या फिर्यादीवरुन बामणी पोलिस ठाण्यात खाजगी सावकार तातेराव चव्हाण, गजानन करसकर, बाबासाहेब ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ तपास सपोनि एस़एस़ खान करीत आहेत़