लोकमत न्यूज नेटवर्ककंधार/बारूळ (जि़ नांदेड) : राज्य शासनाने चालू थकबाकीदारांना कर्जमाफी न दिल्यामुळे, रविवारी एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. या शेतकऱ्याने यापूर्वीच चालू थकबाकी माफ करावी, अन्यथा इच्छामरण द्यावे, अशी मागणी केली होती़काशीनाथ कोळगिरे (५८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. २९ जून रोजी त्यांच्यासह काटकळंबा येथील अन्य शेतकऱ्यांनी, ‘कर्जाचे नियमित हप्ते भरणे आमचा गुन्हा आहे का? आम्हाला कर्जमाफी नसेल, तर स्वेच्छेने मरण्याची परवानगी द्यावी,’ अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकाऱ्याकडे केली होती़, तसेच हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे फॅक्सही करण्यात आले. या वेळी येथील ४० शेतकऱ्यांनी चालू कर्ज न भरण्याचीही शपथ घेतली. बँकेच्या कर्जाचे डोंगर या पार्श्वभूमीवर मुलीचे लग्न कसे करावे, या विचाराने कोळगिरे यांना घेरले,यातून त्यांनी घरातच गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे़ही घटना टळली असती...शासनाला यापूर्वीच या संदर्भात कल्पना दिली होती़ पीक कर्जदारांचे चालू कर्ज माफ झालेअसते, तर ही घटना टळली असती, असे काटकळंबा येथील शेतकरी बाळू पा़ पानपट्टेयांनी सांगितले.
शेतकऱ्याने घेतला गळफास
By admin | Published: July 04, 2017 4:31 AM