शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘समृद्धी’च्या शेतजमीन मूल्यांकनासाठी लाच मागितल्याने शेतकऱ्याचे विषप्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:56 IST

समृद्धी महामार्गासाठी दिलेल्या शेतजमिनीच्या मूल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेले किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे

दुसरबीड (जि. बुलडाणा) : समृद्धी महामार्गासाठी दिलेल्या शेतजमिनीच्या मूल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेले किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे (४७) यांनी शुक्रवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.कृषी अधिकाºयांनी मूल्यांकनासाठी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप नंदकिशोर यांचे बंधू पंजाबराव मांटे यांनी केला आहे.मांटे कुटुंबाची पाच एकर शेतजमीन आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग त्यांच्या शेतातून जातो. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून जमीन अधिग्रहण व त्यातील बाबींसाठी नंदकिशोर मांटे यांनी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला. मात्र शेतातील आंब्यांच्या बागेचे मूल्यांकनच न केल्याचा मांटे कुटुंबियांचा आरोप आहे. वडिलोपार्जीत शेतात पूर्वी मोसंबीची बाग होती; मात्र मध्यंतरीच्या दुष्काळामुळे ती बाग मोडून आंब्यांची झाडे लावण्यात आली.जिल्हाधिकाºयांच्या पत्रानंतरही मूल्यांकन, अधिग्रहण व मोबदल्याची प्रक्रिया पार पडली नाही. त्यातच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लाचेची मागणी केल्याचे मांटे यांचे म्हणणे आहे. तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही.स्थानिक आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही यंत्रणेला पत्र दिले होते. त्यावर जिल्हाधिकाºयांनी ३ एप्रिलला उपविभागीय अधिकाºयांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणात कृषी विभागाने सर्व बाबी तपासून नियमानुसार तत्काळ मूल्यांकन करावे व महसूल उप-विभागाचे मूल्यांकनाचे प्रस्ताव तत्काळ जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीकडे पाठवावेत, असे स्पष्ट केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.नंदकिशोर मांटे हे विषप्राशन करून किनगाव राजा पोलीस ठाण्यात आले होते. समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचे योग्य मूल्यांकन होत नाही. त्यासाठी अधिकारी त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. अजून तक्रार दाखल नाही.- जे. बी. शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक, किनगाव राजासंबंधित शेतकºयाकडून चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करण्याची गळ घातली जात होती. यासंदर्भात ८ मे रोजी ते भेटले होते. तेव्हा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयालाही संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. अनुषंगिक कागदपत्रेही उपलब्ध आहेत.- प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा