- लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : भाजपाने शेतकऱ्यांसाठी, ‘संवाद यात्रा’ सुरू केली असताना, भाजपाचे खासदार आणि आमदार शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुऊन घेतात असे सांगत, अशा नेत्यांवर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची भाजपा आमदार-खासदारांची लायकी नसल्याचे टीकास्त्र शेट्टी यांनी सोडले. पुण्यावरून सुरू केलेल्या ‘आत्मक्लेश यात्रे’दरम्यान त्यांचा पायी प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू आहे. शनिवारी पनवेलमध्ये आले असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, आदी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यावरून सुरू केलेली, ‘आत्मक्लेश यात्रा’ १४० किलो मीटरचा प्रवास पूर्ण करून, शनिवारी पनवेलमध्ये दाखल झाली. या वेळी सलग सहा दिवस पायी चालल्याने खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे, त्यांचे पाय सुजले आहेत, तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन सरकारने दिले होते.
शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची लायकी नाही
By admin | Published: May 28, 2017 12:51 AM