शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जमीन विक्रीला

By admin | Published: April 03, 2017 6:41 AM

सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली

नंदकिशोर पाटील,मुंबई- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांची भाऊगर्दी अवतीभोवती असताना, उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा (ता. उमरगा) येथील सधन शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीत सक्रिय असलेले विनायकराव पाटील यांची कवठा (ता. उमरगा) येथे बारमाही पाण्याखालची शेतजमीन आहे. त्यापैकी तेरणा नदीकाठावरील लातूर-उमरगा राज्यमार्गालगत असलेली दहा एकर शेती त्यांनी विक्रीला काढली आहे. याबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, सदर जमीन विक्रीतून आलेल्या पैशांमधून आत्महत्याग्रस्त उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील काही गावे दत्तक घेऊन, तेथील गरीब थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जफेड करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीतून विनायकराव पाटील यांनी आजवर अनेकदा मदतीचा हात पुढे केलेला आहे. मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना, त्यांनी मोफत छावणी उघडून पाच हजार मुक्या जीवांचा दोन वर्षे सांभाळ केला. गतवर्षी स्वत:च्या शेतामधून दररोज ५० लाख लीटर मोफत पाणीपुरवठा करून, त्यांनी लातूरकरांची तहान भागविली. दुष्काळग्रस्त गावातील ५० शेतकरी दत्तक घेऊन, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बियाणे दिले आहे.>भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनातही योगदान१९९३ च्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या किल्लारी, सास्तूर, कवठा आदी गावांच्या पुनर्वसन कार्यातही विनायकराव पाटील यांचे योगदान राहिलेले आहे. या कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र सरकारने दत्तक घेतलेल्या गुजरातमधील भूजच्या पुनर्वसनाची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपविली होती. समाजाचे काही तरी देणे लागते, या भावनेतून मी हा निर्णय घेतला आहे. इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा कोणीतरी स्वत:पासून सुरुवात करायला हवी होती.-विनायकराव पाटीलशेतीविक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाटील यांचा भ्रमणध्वनी सतत खणखणत आहे. जमीन विकत घेण्यासाठी नव्हे, तर या कार्यात योगदान देण्याची इच्छा व्यक्त करणारे असंख्य कॉल्स आल्याचे त्यांनी सांगितले. कवठा गावातील तरुणही पुढे सरसावले असून, गरीब शेतकऱ्यांना मदतीचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.