शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

शेतकरी संप : सर्व मागण्या मान्य न झाल्याने शिवसैनिकांचा रास्तारोको

By admin | Published: June 03, 2017 1:04 PM

शनिवारी धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तिस:या दिवशी सकाळी शुकशुकाट

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 3 - प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी शेतक-यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शेतक-यांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्याने शेतकरी संप मिटला आहे. संप मागे घेण्यात आला असला तरीही शनिवारी धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी शुकशुकाटच होता.  बाजार समितीत शनिवारी मक्याची 40 पोतेच आवक झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरख पाटील यांनी दिली़.

तर दुसरीकडे, शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यानं शिवसैनिकांनी चाळीसगावरोड चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करत येथील परिसर दणाणून सोडला.

धुळे बाजार समितीत मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर येत. एरव्ही 700 ते 800 पोते येणारा मका आता या संपामुळे दुस-या दिवशी 30 पोते तर तिस-या दिवशी 40 पोते मालाची आवक होती़. परिणामी अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत होणारी आर्थिक उलाढाल केवळ 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत आली आहे. साहजिकच याचा फटका बाजार समितीला सोसावा लागत आहे.

शेतमालाला रास्त भाव मिळावा, शेतक-यांची संपूर्ण कजर्माफी व्हावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 1 जूनपासून शेतक-यांच्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली. परिणामी संपाला जिल्ह्यातून प्रतिसाद लाभत आहे.

धुळे, साक्री दोंडाईचा येथील बाजार समितींसह  पिंपळनेर उपबाजार समितीच्या आवारात शेतकरी फिरकलेच नाही़. शेतक-यांनी भाजीपाल्यासह कांदे आणि दूध रस्त्यावर फेकत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. तर बाजार समितीत हमाल केवळ हमालांची हजेरी आहे. 

गुजरातकडे जाणारे ट्रक शेतक-यांनी रोखलेसाक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून गुजरात राज्याकडे जाणारे दूधाचे व भाजीपाल्याचे टँकर शेतक-यांनी संघटनांच्या प्रतिनिधींनी रोखून धरले होते. परंतु, शेतक-यांच्या 70 टक्के मागण्या शासनाने पूर्ण केल्यामुळे गुजरात राज्याकडे जाणा-या टँकर सोडण्यात आल्याची माहिती महेश मराठे यांनी दिली आहे.

शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

दरम्यान, शासनाने शेतक-यांच्या सर्व मागण्या पूर्ण न केल्यामुळे शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेतर्फे शनिवारी दुपारी 12 वाजता चाळीसगाव रोड चौफुलीवर ‘रास्ता-रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.