लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, यात शेतकऱ्यांचे मागील थकीत वीजबिल माफ केले आहे. ७.५ एचपीपर्यंतच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा मोफत केला असून, मागील वीजबिलाची थकबाकी द्यायची नाही अन् पुढील वीजबिलही भरायचे नाही, असा ‘अर्थ’पूर्ण सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला. उदगीर येथे उपमुख्यमंत्री पवार यांची जनसन्मान यात्रा झाली.
यावेळी मंचावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी रात्रीऐवजी आता दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यापुढील अर्थसंकल्प ७ लाख कोटी रुपयांचा सादर करू, असेही ते म्हणाले.
सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार nयावेळी अजित पवार म्हणाले, महायुती सरकारने लोककल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळे राज्यात आर्थिक संकट ओढावेल, असा आरोप विरोधक करीत आहेत.nमात्र, पुढील काळात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहतील. शेतकऱ्यांच्या मोफत वीजबिलासाठी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.nमाझ्याकडे दहा वर्षांपासून अर्थ खाते असल्याने विकासकामांसाठी निधींची तरतूद कशी करावी, आर्थिक गळती थांबवून आर्थिक सुबत्ता कशी आणावी, याचा आपणास अनुभव आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना पुढे सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.