अकोला : राज्यात आतापर्यंत साडेअकरा हजार सामूहिक शेततळ्य़ापर्यंतचा विस्तार झाला आहे. पण या तळ्य़ांना कुंपणाचे संरक्षण नसल्याने वाशिम जिल्हय़ातील रिसोड येथील तीन विद्यार्थिनींचा शेततळ्य़ात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यांनतर या शेततळ्य़ाच्या कुंपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकर्यांना संरक्षित सिंचन करता यावे, यासाठी राज्यात आतापर्यंत १0,१४६ सामूहिक शेततळी शेतकर्यांच्या शेतात बांधण्यात आली आहेत. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५0 कोटी, तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २३ असे एकूण ७३ कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्यात २00५ पर्यंत सामूहिक शेततळ्य़ांची संख्या केवळ पाच हजार होती. अनुदानामुळे शेततळय़ांची संख्या वाढली. २0१३ या एकाच वर्षात राज्यात तब्बल ५,१४६ शेततळी बांधण्यात आली असून, शेततळय़ांची मागणी वाढतच आहे. शेततळ्य़ांचे वेगवेगळे पाच प्रकार असून, तळ्य़ाचे स्वरू प बघून ६५ हजार रुपयांपासून ते ५.५६ लाख रूपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या अनुदानातून शेततळे बांधणे, पॉलिथिनचे अस्तरीकरण करणे, खोदकाम करताना निघालेल्या मातीवर पाणी टाकून त्या मातीचे बांध तयार करणे, तळ्याच्या भरावावर चारही बाजूने गवत लावणे, आदी कामं अपेक्षित आहेत. विशेष म्हणजे, या तळ्य़ांचे सरंक्षण म्हणून, तळय़ाला कुंपण घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कुंपणाच्या खर्चाची तरतूद अनुदान देतानाच केली जाते. प्रत्यक्षात या शेततळ्य़ांना कुंपणच घातले जात नसल्याने, ही शेततळी म्हणजे मृत्यूचा सापळाच ठरत आहेत. वाशिम जिलतील रिसोड येथे ३ ऑगस्ट रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. रिसोड येथील एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकणार्या इयत्ता नववीच्या तीन मैत्रिणी फ्रेण्डशीप डे साजरा करताना शेततळ्य़ात बुडून मरण पावल्या. रिसोड येथील या शेततळय़ाला कुंपण असले तरी, या दुर्दैवी घटनेने कुंपणाशिवाय असलेल्या इतर शेततळय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळय़ांना कुंपण बांधलेच जात नसेल, तर कृषी विभागाचे अधिकारी अनुदान कसे देतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेततळय़ांनी खाल्ली कुंपणं!
By admin | Published: August 06, 2014 12:57 AM