रूपेश उत्तरवार ।यवतमाळ : कर्जवाटपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडे एक हजार कोटींची रक्कम वळती करण्यात आलेली असताना या बँकांनी श्ोतकºयांना एक छदामही वाटला नाही. याउलट यादीत नाव नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठविले गेले आहे. यवतमाळ, बुलडाणा आणि बीड जिल्ह्यात हे प्रकार घडले.राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ अद्यापही ‘ओके’ नाही. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या त्यांच्याकडे नाहीत. किती शेतकरी ‘वनटाइम सेटलमेंट’मध्ये येतात, किती शेतकरी बोनस मदतीसाठी पात्र ठरले आहेत, याचीही माहिती राष्ट्रीयीकृत बँकांकडे नाही. यामुळे कर्जवाटपाचा कार्यक्रमच थांबला आहे.
परतफेडीसाठी तीन हप्तेराष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीस पात्र शेतकºयांचा अहवाल तयार करताना अनेक चुका केल्या आहेत. शेतकºयांना दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र ठरविण्यात आले. तरी बँकेत मात्र ६५ हजार कर्ज असणाºया शेतकºयांचे ४० हजार कर्ज माफ झाले. २५ हजार अजूनही माफ व्हायचे आहे. त्यासाठी बँक व्यवस्थापकांनी तीन हप्ते पाडून कर्ज परतफेड करा, अशा अफलातून सूचना दिल्या आहेत.सानुग्रह अनुदान खाते ‘एनपीए’मध्येनियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयाच्या खात्यात २५ हजारांपर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तरी काही बँकांनी शेतकºयांना आपले खाते ‘एनपीए’मध्ये गेल्याचा अजब एसएमएस पाठविला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या छळाने शेतकरी वैतागले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठांच्या कानावर या बाबी टाकल्या जाणार आहेत.- किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन