१३ टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांची लुटमार; अजित पवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:00 AM2019-06-17T05:00:16+5:302019-06-17T05:02:44+5:30
कर्जमाफी किती जणांना मिळाली? म्हणूनच आत्महत्यांमध्ये वाढ
मुंबई : आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना ० ते २ टक्के दराने पीककर्ज वाटप केले; परंतु फडणवीस सरकार शेतकºयांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेतील विकास आराखड्यात मुख्यमंत्री कार्यालयातून १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. विखे यांनी पुन्हा तो विषय काढू नये म्हणूनच कदाचित त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले असेल, असा आरोप अजित पवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांनी केला. या आरोपाचे पुढे काय झाले हे विखे यांना विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २२ हजार गावे टँकरमुक्त होणार होती; पण प्रत्यक्षात ३० हजार गावे दुष्काळात सापडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेत सरकारचे किती पैसे खर्च झाले, त्यातले किती पैसे ठेकेदारांची बिले देण्यात गेली, याचा हिशोब द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.