- अझहर शेख, नाशिक डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षे, कांदा, मका, ऊस या प्रमुख पिकांच्या उत्पादनासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. द्राक्षमळ््यांमुळे वायनरी उद्योग व्यावसायिकांनाही नाशिकने आकर्षित केले आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटनही विकसित होताना दिसत आहे. ‘महाभ्रमण’, निवास - न्याहारी’ योजनांद्वारे कृषी पर्यटन सुरू झाले आहे. शहरापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर खेड्यांमध्ये कृषी पर्यटन विक सित होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध उपलब्ध होत आहे. दिंडोरी, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या धरणांच्या तालुक्यात सह्याद्रीची पर्वतरांग असल्याने कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे. या सर्व तालुक्यांचा परिसर मुंबई, पुणे, गुजरातपासून कमी अंतरावर असल्यामुळे पर्यटक येत आहेत. आम्ही दोघा भावंडांनी वडिलांच्या संकल्पनेतून शेतीच्या जागेत गिरणारे गावाजवळच कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. गंगापूर धरणाचे बॅक वॉटर व निसर्ग सौंदर्यामुळे आमच्या प्रकल्पाकडे पाच वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. हा प्रकल्पच आमचा मुख्य व्यवसाय झाला आहे. - अभिजित शिरसाठ, शेतकरी.जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वर्ग नव्या दृष्टीने कृषी पर्यटन संकल्पनेकडे बघू लागल्याने कृषी पर्यटन अधिक विकसित होत आहे. ‘अॅग्री टुरिझम’मध्येही नाशिक आपला ठसा उमटवत आहे. -नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.
नाशिकचे शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर
By admin | Published: December 25, 2016 3:51 AM