शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

शेतकऱ्यांची बियाणे बँक

By admin | Published: May 01, 2017 5:14 AM

वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस

नीलेश धोपेश्वरकर / ठाणे/पालघर वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. पण, समाजात अशा काही व्यक्ती किंवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांचे खासकरून आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील संजय पाटील आणि बायफ संस्था. पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील ११ गावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील एतापल्लीमधील १५, नंदुरबार जिल्ह्यातील धडगावमधील १२, पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील ६ आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील १० अशा सुमारे ५४ गावांमध्ये बियाणांचे संशोधन, संवर्धनाचे काम सुरू आहे. यातील बहुतांश पट्टा हा आदिवासी आहे. अशा संवर्धनातून बियाणांची बँक तयार झाली. यातून शेतीच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे ते म्हणाले. कमी किंवा दुर्मीळ होत चाललेली पिके किंवा बियाणे यांचे पुनरुज्जीवनही केले जाते.बायफसारखी संस्था पाठीशी खंबीरपणे उभी असल्याने या उपक्रमाला यश मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्यामुळे कामाला गती आणि दिशा मिळाली. एकाच प्रकारची पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत कसा राखला जाईल, तग धरणारी कुठली पिके, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. बियाणांची स्वायत्तता, सुरक्षिततेबरोबरच बँकेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे, हाही हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे चार भिंतींत संशोधन केले जाते. आम्ही थेट शेतात जाऊन ते करतो. तेही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत. बियाणे वापरण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते, असे पाटील यांनी सांगितले. संशोधन करून बियाणे तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने ते रजिस्टर करण्यासाठी बायफ संस्था पुढाकार घेते. दोघांना राष्ट्रीय पुरस्कारजव्हार तालुक्यातील चौक गावातील मावंजी पवार या तरुणाने वडिलांबरोबर शेती करत असतानाच बायफच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्याने भाताच्या वाणाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. संवर्धन, संशोधनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मावंजी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर, जव्हार तालुक्यातीलच सुनील कामोदी याने भाताचे अश्विनी नावाचे वाण बायफच्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने तयार केले. त्यालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले.