शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शेतकरी कर्जदार होऊच नये

By admin | Published: July 17, 2017 8:36 PM

शेतकरी कर्जदारच होऊ नये, यासाठी शेतकरी संघटना आता अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करीत आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला सादर करणार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.  17 : शेतकरी कर्जदारच होऊ नये, यासाठी शेतकरी संघटना आता अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करीत आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला सादर करणार आहे. सरकारने हा प्रस्ताव न स्वीकारल्यास राज्यभर शेतकरी संघटना ३ सप्टेंबरला ग्रामपंचायतीपुढे कर्जमुक्ती दिवस पाळून एक दिवसाचे उपोषण करणार आहे. आमदार निवासात शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या प्रस्तावात शेती क्षेत्राला आर्थिक स्वातंत्र मिळण्यासाठी सरकारने काय करावे, याची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात येणार आहे. सरकारने शेतमालाबाबत धोरण निश्चित करावे. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेला मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करावी. यासह शेतकरी स्वावलंबी कसा होईल, तो पुन्हा कर्जदार होणार नाही, यासंदर्भात संपूर्ण अभ्यास होणार आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनाचे अवलोकन करण्यात आले. सरकारने केलेल्या अपूर्ण कर्जमाफीवर अभ्यासात्मक विवेचन करण्यात आले. कर्जमाफीबद्दल सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. बँकेच्या गैरपद्धतीच्या व्यवहारामुळे कर्जमाफी बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक आणि दिशाभूल करणारा सरकारचा निर्णय असल्याचा सूर बैठकीत निघाला. त्यामुळे शेतकरी संघटना आपला प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमुक्ती द्यावी व वीज बिल माफ करावे अशी मागणी सुद्धा करणार असल्याचे घनवट म्हणाले. पत्रपरिषदेला वामनराव चटप, गीता खांडेभराड, शैलजा देशपांडे, गुणवंत पाटील, राम नवेले, सतीश दाणी, मदन कामडे, संतूपाटील झांबरे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

 
आणखी वाचा 
चांगल्या वर्तणुकीमुळे संजय दत्तची शिक्षा कमी केली
"इंदू सरकार" विरोधात काँग्रेस आक्रमक, मधूर भांडारकरांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था
मुंबई : वर्सोव्यात नामांकित शाळेतील महिला कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

- शेतकरी संघटनेच्या सरकारकडे मागण्या कर्जमुक्ती व वीज बिलमुक्ती करावी.शेतजमिनीसंदर्भातील कायदे रद्द करावे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोकळी करावी.शेतमालाच्या प्रक्रियेवरील निर्बंध हटवावेत.केंद्र सरकारने पारित केलेल्या एल.ए.आर.आर.-२०१३ कायद्यातील तरतुदीचे पालन करावेरस्ते, वीज, साठवणूक आदी संरचना निर्माण करावी.आंदोलन लेखा-जोखा१ आॅगस्टपासून भाजपाच्या नेत्यांना सभाबंदी३ सप्टेंबर रोजी गावागावात संपूर्ण कर्जमुक्तीसाठी उपोषणकर्जमुक्ती व वीज बिलमुक्तीसाठी ग्रामपंचायत व ग्रामसभेत ठराव पारितराष्ट्रपतींना पाठविणार निवेदन