शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अमरावतीत कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 3:41 PM

अनिल बकाले हे चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी रोजी जळका जगताप मार्गातील भगत यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला.

चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने जळका शिवारातील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अनिल वासुदेवराव बकाले (४०, रा. आमला विश्वेश्वर) असे दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. अनिल बकाले हे चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी रोजी जळका जगताप मार्गातील भगत यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. अनिल बकाले यांच्या डोक्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीड लाखांचे कर्ज होते. त्यांच्याकडील पाच एकर शेतात यंदा सोयाबीन, कपाशी, तूर ही पिके होती. त्यापैकी सोयाबीन पिकले नाही, तर कापूस चार क्विंटल आणि तुरीचे तीन क्विंटल पीक आले होते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्मघात केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात दोन धाकटे भाऊ, आई, पत्नी, सहा वर्ष व आठ महिने वयाची दोन मुले आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी