शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:38 AM

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एका शेतक-याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुलाब मारुती शिनगारे असे या शेतक-याचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत.

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एका शेतकºयाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुलाब मारुती शिनगारे असे या शेतक-याचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत.धर्मा पाटील या वृद्ध शेतक-याने केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असताना शुक्रवारी दीडच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुलाब मारुती शिनगारे या ५७ वर्षीय शेतक-याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासन हादरून गेले. मंत्रालय सुरक्षा कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखले आणि मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले.काय आहे प्रकरण?गुलाब शिनगारे हे माजलगाव (जि. बीड) येथील रहिवासी आहेत. तिथल्या काही राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे घर पाडून टाकले. तसेच त्यांच्या घराची जागाही ताब्यात घेतली. या अन्यायाविरोधात शिनगारे यांनी स्थानिक स्तरावर दाद मागितली. मात्र तेथे प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपले गाºहाणे मंत्रालयात येऊन मांडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी ते मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न करत असता सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिनगारेंनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय