शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पोलिसांच्या व्हॅनमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: March 25, 2017 2:37 AM

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर, औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारे

मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर, औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी वायरलेस व्हॅनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी भुसारेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.भुसारे यांना गारपिटीमुळे फटका बसला. त्यांचे शेत पूर्ण उद्ध्वस्त झाले, याची नुकसान भरपाई मिळावी, म्हणून गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी आग्रह धरला. मात्र, मंत्रालय बंद होण्याची वेळ झाल्याने पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यातच त्यांनी पोलिसांच्या हातावर चावा घेतला. या घटनेनंतर भुसारेंना पोलीस व्हॅनमधून नेत असताना त्याची पोलिसांसोबत बाचाबाची सुरू होती. याच दरम्यान वायरलेस व्हॅनमध्ये असलेल्या दोरखंडाने त्यांनी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडविले. यामुळे हे प्रकरण आणखी तापले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)