रिसोड (जि. वाशिम), दि. २६: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील मोप येथील ४५ वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी लोणी शेत शिवारात उघडकीस आली. अशोक रुंजाजी नरवाडे (वय ४५) यांच्याकडे वडिलोपार्जित अडीच एकर जमीन होती. तसेच त्यांच्यावर सावकाराचे तथा बँकेचे जवळपास ४0 हजार रुपयांचे कर्ज होते. यावेळीदेखील शेतातील सोयाबीन पिकांची स्थिती समाधानकारक नसल्याने नरवाडे गत काही दिवसांपासून चिंतेत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या भाऊ शेषराव नरवाडे सोयाबीनला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना अशोक नरवाडे यांनी कीटकनाशक प्राशन केलेले आढळून आले. तातडीने अत्यवस्थ स्थितीत अशोकला उपचारार्थ रिसोड येथे आणण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: August 27, 2016 2:57 AM