शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तुरखेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 20:49 IST

विष प्राशन : पाण्याअभावी १२ एकरातील फळझाडे तोडली

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील तुरखेड येथील शेतकरी गजानन सुखदेव सुकळकर (६०) यांनी स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. पाण्याअभावी आठ एकर शेतातील केळी व चार एकरांतील डाळिंबाची झाडे तोडावी लागली. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड, भंडारज, कारला भागात केळी, संत्र्याचे पीक घेतले जाते. काही प्रयोगशील शेतकºयांनी डाळिंबाचीसुद्धा लागवड आपल्या शेतात केली. तथापि, मागील पाच-सहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे पाणीपातळी खोल गेल्याने या पिकांना जगविण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. गजानन सुकळकर यांच्याकडे २४ एकर शेती आहे. त्यापैकी आठ एकरांत केळी व चार एकरांत डाळिंब हे फळपीक होते. पाणीपातळी खोल गेल्याने तिन्ही बोअरवेलचे पाणी आटले. त्यामुळे केळी व डाळिंबाची झाडे तोडण्याशिवाय सुकळकर यांच्यापुढे पर्याय नव्हता. या पिकासाठी घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याच्या जाणिवेतून त्यांनी २० जूनला सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. सुकळकर यांच्यावर सेंट्रल बँकेचे १० ते १२ लाख व खासगी सावकारांचे सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. सावकारी कर्जासंबंधी प्रकरण सहायक निबंधकांकडे प्रविष्ट असल्याचे समजते.